आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

श्रीक्षेञ नारायणपूर येथे दत्तजयंती उत्सव साजरा..

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्रीदत्तजयंतीनिमित्त भाविकांकडून प्रचंड गर्दी .

Spread the love

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्रीदत्तजयंतीनिमित्त भाविकांकडू प्रचंड गर्दी .

आवाज न्यूज : नारायणपूर प्रतिनिधी.९ डिसेंबर.

श्रीक्षेञ नारायणपूर येथे श्री दत्तजयंतीनिमित्त भाविकांकडून प्रचंड गर्दी झाली होती.श्री श्री श्री प.पूज्य श्री नारायणमहाराज यांचे दर्शन व प्रवचन , तसेच लक्ष्मण राजगुरू यांचा एकपाञी भारूडाचे कार्यक्रमास प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी पहाटे श्री दत्तनामाचा जप , आभिषेक , होमहवन , आणि आरतीनंतर श्री दत्तमहाराज यांचे दर्शनास तसेच ता.६ राञी सायंकाळी सात वाजता श्री दत्तजन्माचा सोहळा प.पूज्य नारायणमहाराज यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यानंतर श्रीदत्तजयंतीनिमित्त दत्तजन्माचा पाळणा गायन झाले. यावेळी आरती झाली. सर्वांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.

ता.७ रोजी पहाटे श्री दत्तमंदिरात पूजा , अभिषेक ,होमहवन आणि आरती झाली. सकाळी श्री मुर्ती व पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. यानंतर ग्रामप्रदक्षिणा ढोलताशांच्या गजरात व टाळमृदूंगाचे तालात काढण्यात आली. यावेळी येथील पंचगंगा स्नान घालून पालखी पुन्हा मंदिरात वाजतगाजत आणल्यानंतर प.पूज्य नारायण महाराज यांचे आशिर्वाद पर प्रवचन झाले.आरतीनंतर दर्शनास प्रारंभ झाला..राञी नऊ वाजता आरतीनंतर राञी बारा पर्यत श्रीची मंदिरातच टाळ मृदूंगाचा गजर आभंग , गवळणी गात पालखीतून श्रीची मिरवणूक काढण्यात आली..

महाप्रसादाचा कार्यक्रम व दर्शनाचा कार्यक्रम झाला.. राञी काही क्रीडापथकांकडून मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.त्याचा हजारो लोकांनी लाभ घेतला..
पुरंदर गडाकडे जाणाऱ्या मार्गापर्यत दुकानदारांनी दुतर्फा दुकाने लावून व्यवसाय केला.. लाखो लोकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!