आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत असल्याने, रविवार दि. २५/१२/२०२२ रोजी भरणारा आठवडे बाजार स्थलांतरीत करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील,बाजारपेठ या ठिकाणी असणाऱ्या चर्च मधे अनेक ख्रिश्चन बांधव प्रार्थनेसाठी जमा होणार असल्याने त्या दिवशीचा आठवडे बाजार हा फक्त मारुती चौक ते डाळ आळी या परिसरात भरणार आहे... विजय कुमार सरनाईक.मुख्याधिकारी, त.दा.न.प.

Spread the love

ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत असल्याने, रविवार दि. २५/१२/२०२२ रोजी भरणारा आठवडे बाजार स्थलांतरीत करण्यात आला आहे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २३ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे शहराच्या आठवडे बाजाराच्या दिवशी रविवार दिनांक २५/१२/२०२२ रोजी ख्रिसमस व पुढील महिण्यातील जानेवारी ०१/०१/२०२३ रोजी नविन वर्ष येत आहे. या दोन्ही दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव संख्येने एकत्र येवून जिवत परमेश्वराची आराधना करून सन साजरा करत असतात. या ठिकाणी ख्रिस्ती समुदाय मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने आठवडे बाजारातील बाहेरील गर्दी, गोंधळ व विक्रेत्यांच्या प्रचंड आवाजामुळे चर्चमध्ये परमेश्वराची आराधना करण्यास भाविकांची गैरसोय होऊ शकते.

त्या दिवशीचा म्हणजे दिनांक २५  डिसेंबर रोजी चा आठवडे बाजार हा फक्त मारुती चौक ते डाळ आळी या परिसरात भरणार असून त्याची तमाम भाजी विक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन  तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

पुढील महिण्यातील रविवार दि. ०१/०१/२०२३ रोजीचा आठवडे बाजार स्थलातरीत न करता प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असल्येल्या चर्चच्या मार्गाकडे जाणा-या रस्त्यावर कोणात्याही विक्रेत्यांना दुकान लावू न देणे व सदरील मार्गावरुन चारचाकी वाहने चर्च पर्यंत सहजरित्या पोहचू शकतील याप्रमाणे रस्त्यावरील बाजार विक्रेत्यांचे नियोजन करावे.या दिवशी सकाळी ख्रिस्ती बांधवाना प्रार्थनेसाठी चर्च पर्यंत सहजरीत्या पोहचता यावे, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र ते चर्च या दरम्यान सकाळी कोणत्याही विक्रेत्यांनी बसू नये याकरिता नगरपरिषद पथकास सूचना देण्यात आलेचे नगरपरिषद मार्फत नमूद करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!