डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरेंच्या गायनाने तळेगावकर मंत्रमुग्ध..
गोनीदां'च्या नावाने साकारण्यात आलेल्या उद्यानाच्या नामकरण कार्यक्रमानंतर संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांच्या 'आयुष्यावर बोलू काही' संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरेंच्या गायनाने तळेगावकर मंत्रमुग्ध..
आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १० डिसेंबर.
गोनीदां’च्या नावाने साकारण्यात आलेल्या उद्यानाच्या नामकरण कार्यक्रमानंतर संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही मैफिल अनुभवण्यासाठी गुलाबी थंडीतही रसिकांनी गर्दी केली होती. ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’, ‘अगो बाई ढगोबाई’, ‘सरीवर सर’, ‘तूच चंद्रमा’, ‘गझल- तुज बघता सारा हिशोब चुकला होता’, ‘हा देही वणवा पिसाटला’, ‘सांग सख्या रे’, ‘गाडी सुटली रुमाल हलले’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी तुला’ अशा एकाहून एक सरस गीतांची मेजवानी त्यांनी दिली.
रसिकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून कार्यक्रमाला दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, जनसेवा विकास समिती व किशोरभाऊ आवारे मित्र परिवाराने परिश्रम घेतले.