आरोग्य व शिक्षण

मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सिल करणेस नगरपरिषदेमार्फत सुरुवात.

रुपये ५० हजार पेक्षा थकबाकी अधिक आहे, अशा मालमत्ता धारकांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ चे कलम १५२ अंतर्गत जप्ती वॉरंट..

Spread the love

मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सिल करणेस नगरपरिषदेमार्फत सुरुवात.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १३ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीमधील ज्या मालमत्ता धारकांनी मागील काही वर्षापासून मिळकत कराचा भरणा केलेला नाही व ज्यांची मिळकत कर थकबाकीची रक्कम रुपये ५० हजार पेक्षा अधिक आहे, अशा मालमत्ता धारकांवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ अंतर्गत जप्ती वॉरंट बजाविणेत आलेले होते व मिळकत कराची थकबाकीची रक्कम भरणे करिता काही अवधी देणेत आलेला होता. परंतु सदर अवधी उलटूनही मिळकत धारक कराची रक्कम भरत नसलेचे निदर्शनास आलेने नगरपरिषदेमार्फत आजपासून स्थावर मालमत्ता सिल करणेची कार्यवाही सुरु करणेत आली आहे. या अंतर्गत आज करनिरीक्षक विजय शहाणे यांचे मार्गदर्शनाखालील प्रशांत गायकवाड, प्रविण शिंदे, उषा बेल्हेकर, विलास वाघमारे या पथकाने वाघेला पार्क, तळेगाव दाभाडे येथील २ दुकान गाळे व एक फ्लॅट सिल केलेला आहे.

तरी ज्या थकबाकीदारांना नगरपरिषदेमार्फत जप्ती वॉरंट बजाविणेत आलेले आहेत. त्यांनी आपल्या थकित मिळकत कराचा भरणा त्वरीत नगरपरिषद कार्यालयात करावा, व जप्तीची कार्यवाही टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!