महाराष्ट्र

जे जे भेटेभूत –ते ते जाणिजे भगवंत!..

ज्ञानेश्वर माऊलीने 700 वर्षांपूर्वी आपल्या एका ओवीत असं म्हटलं आहे की- प्रत्येक जीवित प्राण्यात साक्षात परमेश्वरी अंश असतो!

Spread the love

जे जे भेटेभूत –ते ते जाणिजे भगवंत!

ज्ञानेश्वर माऊलीने 700 वर्षांपूर्वी आपल्या एका ओवीत असं म्हटलं आहे की- प्रत्येक जीवित प्राण्यात साक्षात परमेश्वरी अंश असतो!

आवाज न्यूज : डॉ शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे १५ डिसेंबर..

म्हणूनच त्याची सेवा करणं म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा करण असंच माउलीला या ओवीतून अभिप्रेत आहे*! चला तर मग त्या संदर्भात आणखी थोडं विचार मंथन करूया—मित्रांनो नमस्कार –आपण जीवन जगताना जगाकडे डोळे व कान उघडे ठेवून आणि आपलं मन मोठ ठेवून जर जगलो तर खूप काही इतरांना देण्याची संधी आपल्याला मिळू शकेल! जर मित्रांनो आपण योगी व्हायचं असल्यास आधी आपण उपयोगी असंण नितांत आवश्यक आहे!

मी माझं यांच्या पलीकडले निश्चित आपल्याला जगता येऊ शकत जसं की अन्नदान आहे वस्त्रदान आहे रक्तदान आहे- ज्ञानदान आहे- एवढेच नव्हे तर -जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत- या ज्ञानेश्वर माऊलीच्या उक्तीप्रमाणे- पक्षी- प्राणी यांच्यासाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे. -रस्त्यावरच्या कुत्र्यांना भाकर तुकडा घालणे – रस्त्यावर मागणाऱ्या मुलांसाठी बिस्किट देणे! या गोष्टी प्रत्येकाला सहज शक्य आहेत! मित्रांनो जर आपण डोळसपणे आजूबाजूला पाहिलं तर आपण अशा कितीतरी गोष्टी करू शकतो! विनोबा भावे यांच्या जीवनातील एक घटना आहे की- विनोबाभावेच्या वडिलांनी एका गरजू विद्यार्थ्याला काही दिवस शिकण्यासाठी आपल्या घरी ठेवून घेतलं होतं!

त्यावेळी विनोबांची आई त्या मुलाला गरम-गरम ताज अन्न खाऊ घालायची आणि शिळ पाक उरलेलं अन्न मात्र विनोबांना द्यायची त्यासंदर्भात विनोबाभावे आपल्या आत्मचरित्रात लिहिताच की- मी आईला म्हटलं- अगं आई तू नेहमीच म्हणते की आपण सर्वांना समान वागणूक द्यावी मग तू का स्वतः आम्हाला तशी समान वागणूक का देत नाहीस?त्याला वेगळ आणि मला वेगळं असं का?- त्यावर त्यांची आई म्हणाली की बाबा रे तुझं म्हणणं अगदी खरं आहे! *तु माझा मुलगा आहेस पण त्या मुलात मी साक्षात देव बघते आणि आपण म्हणतो– अतिथी देवो भव. या संस्कृतीत आपण जन्माला आलो आहोत आपण आपलं आयुष्य केवळ मी पणात घालवतो पण मला तसं कधीच करायचं नाहीये मित्रांनो- म्हणूनच रोज रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या आपणच स्वतःला विचारायचं कि मी दिवसभरात आज किती लोकांना उपयोगी पडलो?

आप्तस्वकीय मित्रांसाठी आज मी काय करू शकलो का? आणि जर याच उत्तर नाही असेल तर- दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुन्हा ठरवूया की- मी इतरांसाठी निदान आजपासून काय करू शकतो का? या विचाराने आपल्याला कृतिशीलतेसाठी योग्य ती दिशा मिळेल! कारण निस्वार्थवृत्तीने केलेल्या सत्कृत्त्याचं समाधान आपल्याला शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही! मित्रांनो आपला दिवस जर इतरांना मदत करण्यात सत्कारणी लागला तर त्याहून दुसरा असा कुठलाच आनंद नाही! मित्रांनो आज एक संकल्प सोडू या की– आजपर्यंत झालं ते झालं- पण या यापुढे भाकरी- नोकरी – छोकरी यां पलीकडे माझा प्रत्येक दिवस मी सत्कारणी लावणार आहे! आणि खऱ्या अर्थानं मी अर्थपूर्ण जीवन जगणार आहे !-

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!