आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थाई समितीच्या नियंत्रणाखाली ….

अस्थाई समितीच्या वतीने सहभागी ४५ जिल्हा संघाची नावे जाहीर - पै.संदीप भोंडवे.

Spread the love

पुणे येथे होणा-या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अस्थाई समितीच्या नियंत्रणाखाली

अस्थाई समितीच्या वतीने सहभागी ४५ जिल्हा संघाची नावे जाहीर – पै.संदीप भोंडवे.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १६ डिसेंबर.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे येथे होतील या बाबत काल मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व ब्रिजभुषन सिंह साहेब यांनी एकत्र बसुन जाहीर केले. परंतु महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची चौकशी सुरु असल्याने पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने नेमण्यात आलेल्या अस्थाई समितीच्या नियंत्रणात घेण्यात येणार आहे.

.या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या २०१९ च्या निवडणुकीत जे शहर / जिल्हा कुस्तीगीर संघ समाविष्ट झाले होते तेच संघ महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होतील हे काल दीनांक १५ डीसेंबर रोजी हे परीपत्र काढुन घोषित केले. अस्थाई समितीने काढलेल्या परीपत्रकामध्ये ४५ शहर / जिल्हा कुस्तीगीर संघाची नावे घोषित केली आहे .

भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थाई समितीनेच ही यादी जाहीर केल्याने कुस्तीगीर व कुस्तीशौकीन यांच्यातील ही सभ्रंम अवस्था  आता दुर होईल … अस्थाई समितीने काढलेल्या परीपत्रकामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय तालीम संघ पुणे व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांना दिले असल्याने या दोन्ही संघाचे कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये खेळतील याबाबत शिक्कामोर्तब झाला आहे ..

Two freestyle wrestlers in red and blue uniform wrestling against the lights on background

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!