आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

गाढवाच लग्न फेम प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.

विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'गाढवाचं लग्न' या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

Spread the love

गाढवाच लग्न फेम प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर .१८ डिसेंबर.

विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार दादू इंदुरीकर लोककलाप्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला.तसेच विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानचॆ उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले.
हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.१६) रोजी सायंकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ (गुलाबी शाळा) येथे पार पडला.यावेळी कार्यक्रमाचे अध्य़क्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, विशेष निमंत्रित अभिनेत्री सविता मालपेकर, जेष्ठ पत्रकार सुरेश साखळकर, लावणी कलावंत अर्चना जावळेकर व संगीता लाखे आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील एक प्रसंग मंचावर सादर केला, मोहन जोशी यांनीही त्यांना साथ दिली आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाट झाला आणि एकच हशा पिकला.
“पठ्ठे बापूराव नंतर कोणी तमाशा कलावंत असेल तर ते दादू इंदुरीकर आहे असे मत जेष्ठ लेखक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले, तसेच “गाढवाचं लग्न” या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु करणार असल्याचे सविता मालपेकर यांनी सांगितले.
याबरोबरच विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे पदाधिकारी जाहिर करण्यात आले,मंडळाचे अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ.प्रकाश खांडगे, कार्याध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तळेगाव दाभाडे येथील अध्यक्ष यांची सुरेश धोत्रे,उपाध्यक्षपदी मुंबईविद्यापीठ लोककला अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे व सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, सचिवपदी साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सहसचिवपदी साहित्यिक सोपान खुडे,खजिनदारपदी तळेगाव दाभाडे नगर परिषद माजी नगराध्यक्षा ॲड.रंजना भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विश्वस्तमंडळात कांदबरीकार विश्वास पाटील, डॉ.भावार्थ देखणे,ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, खंडूराज गायकवाड, साहेबराव काशीद, दादु इंदुरीकर यांचे चिरंजीव राजॆद्र सरोदे यांची निवड करण्यात आली.
प्रतिष्ठानच्या उद्घाटनानंतर उपस्थित प्रेक्षकांना रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर व सहकारी यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा लावणीचा बहारदार कार्यक्रम पाहायला मिळाला.
विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या वतीने राज्य पातळीवर लोककला विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे .तसेच लोककलेसाठी परिषद तसेच संमेलन भरवली जाणार आहेत,लोककलेचा जास्ती-जास्त प्रसार या माध्यमातून केला जाणार आहे. लोककलावंत विशेषतः महिला कलांवतांसाठी सोयी-सुविधा मिळवण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत. लोककलेचे संवर्धन व प्रसार व्हावा,यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच दादु इंदुरीकर जन्मशताब्दीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विवध उपक्रम राबविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी,अशी मागणी संस्थेमार्फत शासनाकडे करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी नियोजनाचे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर, संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे,कार्याध्यक्ष गणेश काकडे, उपाध्यक्ष ब्रिजेंद्र किल्लावाला, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे सहकार्यवाह हरिश्चंद्र गडसिंग, सचिव प्रसाद मुंगी,खजिनदार नितीन शहा व सहखजिनदार भरतकुमार छाजेड, राजेश बारणे, कैलास केदारी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!