आरोग्य व शिक्षणकृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

संपर्क बालग्राम या संस्थेच्यावतीने ता.१८ डिसेंबर रोजी भाजे ते लोहगड हेरिटेज वाॕकमधे ६ हजार पर्यटक , विद्यार्थी सहभागी होणार: डाॕ.अमितकुमार बॕनर्जी

देशी व विदेशी पर्यटकांचे लक्ष या प्राचीन वास्तूंकडे वेधून पर्यटन विकास करणे , भाजे , कार्ला व बेडसे लेण्या , लोहगड आणि विसापूर हे गडकिल्ले यांची युनेस्कोमधे नोंद व्हावी , याकरिता स्थानिक लोकांना प्रेरित करणे.

Spread the love

संपर्क बालग्राम या संस्थेच्यावतीने ता.१८ डिसेंबर रोजी भाजे ते लोहगड हेरिटेज वाॕकमधे ६ हजार पर्यटक , विद्यार्थी सहभागी होणार: डाॕ.अमितकुमार बॕनर्जी

आवाज न्यूज ; मावळ प्रतिनिधी, १८ डिसेंबर.

संपर्क बालग्राम संस्थेच्यावतीने ता.१८ डिसेंबर रोजी भाजे ते लोहगड हेरिटेज वाॕकचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे सुमारे ६ ते आठ हजार पर्यटक , विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॕनर्जी यांनी सांगिताले.
देशी व विदेशी पर्यटकांचे लक्ष या प्राचीन वास्तूंकडे वेधून पर्यटन विकास करणे , भाजे , कार्ला व बेडसे लेण्या , लोहगड आणि विसापूर हे गडकिल्ले यांची युनेस्कोमधे नोंद व्हावी , याकरिता स्थानिक लोकांना प्रेरित करणे ,परिसरातील दुर्लक्षित आदिवासी गरीब विद्यार्थांना संरक्षण देणे तसेच त्यांना मदत करणे या करीता सामाजिक जाणीव निर्माण करणे , तसेच स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीचे साधन निर्माण करून देणे हा या हेरिटेज वाॕकचा उद्देश आहे.

यावेळी गुजराती , केरळी , पंजाबी , लोकनृत्यासोबतच कर्नाटकी वाघ्या नृत्य याचाही आनंद घेता येईल.
या वाॕकचे बाबत माहिती देताना संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक सचिव डाॕ.अमितकुमार बॕनर्जी यांनी संपर्क च्या हेरिटेज वाॕकबाबत माहिती दिली. श्री.बँनर्जी म्हणाले , सुमारे एक हजाराचे वर शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी या वाॕकमधे सहभागी होणार आहेत.
मावळ नव्हे महाराष्ट्रात सुमारे पन्नास साठ पेक्षा जास्त गडकिल्ले आहेत,देशात साडेतीनशे ते चारशे पाचशे किल्ले आहेत..या वास्तूंकडे पर्यटकांची ये जा सतत सुरू झाल्यावर येथील लोकांना रोजगार उपलब्द होईल.
मुंबई पुणे यांचे मधोमध असलेल्या मावळातील प्राचीन वास्तूंना गेल्या पाच वर्षापासून प्रकाशझोतात आणण्याचे काम संपर्क ही आनाथ निराधार बालकांसाठी कार्य करीत असलेली संस्था सातत्याने करीत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने सर्वांना जखडून ठेवले होते.दरम्यान चे काळात संपर्कचे हेरिटेज वाॕकचे कार्यात खंड पडला.यावर्षी ता.१८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा.हा सोहळा नव्या जोमाने आयोजित करण्यात आला आहे.
२०१६ पासून संपर्क हेरिटेज वाॕकला सुरूवात झाली. उद्देश हा होता , की भाजे , कार्ला , बेडसे लेणी , लोहगड व विसापूर हे गडकिल्ले यांची नोंद युनेस्कोमधे होणे.
२७ नोहेंबर २०१६ ला झालेल्या या वाॕकमधे ३,५०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!