ताज्या घडामोडी

डॉ. छाया साखरे यांना शिक्षक महोत्सव 2022मध्ये मा. श्री. बाळासाहेब ठाकरे बृहन्मुंबई आदर्श शिक्षक पुरस्कार 2022

Spread the love

डॉ. छाया साखरेजी यांना शिक्षण महोत्सव 2022 मध्ये अक्षर साहित्य व कलामंच, चारकोप गोराई शिक्षक संघ तसेच अखिल भारतीय शिक्षक कल्याण संकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने चारकोप येथे शिक्षक महोत्सव साजरा झाला. यामध्ये छायाजींना मा. श्री. बाळासाहेब ठाकरे बृहन्मुंबई आदर्श शिक्षक 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी मागाठाणे विधानसभेचे आमदार मा. श्री. प्रकाशदादा सुर्वेजी तसेच शिक्षण समिती अध्यक्षा व मा.सौ संध्या विपुल दोशीजी, समाज सेवक विपुल दोशी, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ तसेच राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना श्री . शिवाजी शेंडगे सर, वरिष्ठ मराठी जेष्ठ अभिनेता पोद्दारजी आदी उपस्थित होते. अक्षर साहित्य व कलमंच चे संस्थापक व आयोजक श्री.दिनेश गायकवाड सर यांचे डॉ. छाया साखरेजीनी खूप खूप आभार मानले.
यापूर्वी डॉ छाया साखरेजी ना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांपैकी लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंडियन स्टार अवॉर्ड, मुंबई महापौर पुरस्कार, इंटरनॅशनल टॅलेंट ऑर्गनायझेशन तर्फे अमेझिंग इंडियन पेर्सोनॅलिटी अवॉर्ड, फिल्ममोरा मीडिया नेटवर्क तर्फे के. सी.एफ फाऊंडेशन तर्फे दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड, राडॅसिड फिल्म्स ऑर्गनायझेशन तर्फे ग्लोबल इंडीयन डिवाईन इंडियन स्टार अवॉर्ड 2021, एस. के. स्टार प्रोडक्षण तर्फे मिस्टर/मिस/मिसेस युनिव्हर्स queen अँड किंग 2021 फॅशन शो ओपनर 2021, राष्ट्ररत्न अवॉर्ड, गिरनार संगीत रत्न अवॉर्ड गुजरात , झी टाऊन सोसायटी अवॉर्ड आणि नॅशनल आचिव्हर्स तर्फे एम्पॉंवरिंग विमेन्स ऑफ इंडीया अवॉर्ड, महात्मा गांधी अवॉर्ड, नॅशनल ह्यूमन राईट्स ऑर्गनायझेशन दिल्ली याच्या तर्फे इंडियन आयकॉन अवॉर्ड, कळासाधना संस्था वाशी यांच्या तर्फे जीवन गौरव पुरस्कार , इंटरनॅशनल टॅलेंट आनंदश्री ऑर्गनायझेशन तर्फे आय .टी.गोल्डन ग्लोब अवॉर्ड, त्रीनेत्र फिल्म्स आणि शक्ती फिल्म्स यांच्या तर्फे युथ आयकॉन अवॉर्ड, एम. एम. टी. फॅशन इंडिया अवॉर्ड, चंद्रकला चॅरिटेबल ट्रस्ट जयपूर यांचा तर्फे राष्ट्ररत्न आवर्ड 2021, इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी यांचा तर्फे इंटरनॅशनल रीसर्चेर आवर्ड 2021, युवा भाग्य फूड्स प्रोड्युसर वर्धा यांच्या तर्फे विदर्भ रत्न अवॉर्ड 2021, नॅशनल ह्यूमन वेल्फेअर कौन्सिल तर्फे युथ आयकॉन अवॉर्ड , पीस ऑफ इंडिया परिवार तर्फे पीस ऑफ इंडिया परिवार अवॉर्ड 2021, निर्वाण फौंडेशन नाशिक तर्फे इंटरनॅशनल आयडल आवर्ड , आय.आय. यु कॉन्व्हेंकेशन इंटरनॅशनल रीसर्चेर अवॉर्ड 2021 , के . सी. एफ फौंडेशन मुंबई तर्फे नारी शक्ती पुरस्कार आणि मिस दिल्ली ब्रॅण्ड अँबेसेडर घोषित तसेच ओ. एम. जी रेकॉर्ड, स्टार रेकॉर्ड बुक इंटरनॅशनल, नेशन प्राईड बुक रेकॉर्डस मध्ये नामांकन मिळाले आहे आणि आय.आय. यु इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द्वारे ऑनरररी डॉक्टरेट डिग्री प्राप्त झाली आहे.
डॉ. छाया साखरे यांचं ‘मीरा और मै’ या नावाच प्रथम पुस्तक लवकरच सर्वांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध होईल तसेच डॉ. छाया साखरे यांनी एका तासामध्ये 62 भजने गाऊन ओ. एम.जी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये त्यांचे नामांकन झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!