आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आदिवासी शासकीय आश्रम शाळा वडेश्वर येथील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर

Spread the love

आदिवासी शासकीय आश्रम शाळा वडेश्वर येथील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर संपन्न..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १९ डिसेंबर.

बजाज व विज स्प्रिंग संस्थापुणे यांच्या वतीने व शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या माध्यमातून आदिवासी शासकीय आश्रम शाळा वडेश्वर येथील पहिली ते बारावीच्या  विद्यार्थ्यांचे  डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर घेण्यात आले या वेळी डॉ राहुल चव्हाण  मनोज सोळंकी गणेश चिकणे व निखिल गिरी यांनी विध्यार्थी  चे केसपेपर घेऊन तपासणी केली या वेळी सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी  आपले डोळे तपासून घेतले असून,

ज्या  विद्यार्थ्यांना चष्मा लागला आहे अश्या विध्यार्थी ना २१ दिवसानी शाळेत चष्मा मोफत बनून देण्यात येईल असे बजाज संस्था च्या वतीने  सुरेश पिंगळे यांनी सांगितले या वेळी शिबीर मधील सर्व विध्यार्थी ना मोफत कंपास देण्यात आल्या..

यावेळी मा. सरपंच शांताराम लष्करी जेष्ठ नेते अंनत हेमाडे व मुख्याध्यापक, श्रीकृष्ण दहिफळे व लक्षमण मोरमारे सोनू डोळस ,उल्हास करवंदे इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!