आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

गाईचे डोहाळे जेवण….

चाकण येथील,  शरद नाना धाडगे यांच्या घरी लेकीप्रमाणे सांभाळ होत असलेल्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न..

Spread the love

गाईचे डोहाळे जेवण..

रविवार दि. १८/१२/२०२२ रोजी चाकण येथिल  शरद नाना धाडगे यांच्या घरी लेकीप्रमाणे सांभाळ होत असलेल्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आवाज न्यूज : चाकण प्रतिनिधी, १९ डिसेंबर.

आपल्या पवित्र हिंदु संस्कृतीमध्ये गाईला विश्वाच्या मातेचा दर्जा देऊन तिचे अनन्य साधारण महत्व भारतभुमीतील संतमहापुरूषांच्या माध्यमातून नेहमीचं आधोरेखित केले गेले आहे. परंतु दुर्दैवाने त्याचं विश्ववंदनीय गौमातेच्या हत्येचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. याचं कारण गौमातेप्रतीची वाढती अनास्था, भोगवादी प्रवृत्ती, पाश्चात्य विकृतीचा व जिहादी क्रूरतेचा वाढता प्रभाव.

परंतु अशाही स्थितीत चाकणमधील एक आदर्श व्यक्तीमत्व . शरद नाना धाडगे यांनी आपल्या पत्नी व मुलांसहित गौ-मातेच्या सेवेचा संकल्प धारण केला. चार देशी गौवंशाची सेवा करत असताना लक्ष्मी नावाच्या गाईचे आठव्या महिन्यात डोहाळे जेवण घालण्याचा विचार कु. यश धाडगे व कु. निनाद धाडगे यांनी कुटूंबात बोलून दाखवला आणि घरातील सर्वांनी अगदी तात्काळ या गोष्टीस होकार सुद्धा दिला आणि सोहळ्याचा दिवस ठरवला. गावकी व भावकीला निमंत्रणं गेली व जोरदार तयारी सुरू झाली.

भव्य मांडव, आकर्षक विद्युत रोषणाई, मंगलगीत वाजणारी साऊंड सिस्टीम, सुंदर सजावट तसेच गाईला साडी व आवश्यक मेकअप आणि सुरळीत जेवणाच्या पंगती यामुळे गाईचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला.कालचा गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपुर्ण खेड तालुक्यातील पहिलाचं कार्यक्रम असेल असं बोलण्यात कोणती अतिशयोक्ती होणार नाही. अगदी अशी चर्चा आलेल्या सर्व धाडगे परिवाराचे पाहुणे व मित्र परिवार यांच्यात होत आहे.
गौ-रक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत असताना गाईचं विशेष महत्त्व आपल्या या स्तुत्य कृतीने पटवून देणाऱ्या धाडगे कुटूंबाचे कौतुक चाकण आणि पंचक्रोशीत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!