आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

ध्वजारोहण- प्रतिबिंब हस्तलिखित प्रकाशन-विज्ञान प्रदर्शन- रांगोळी प्रदर्शन- चित्रकला हस्तकला प्रदर्शन! अशा विविध उपक्रमांच मान्यवरांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले...

Spread the love

छत्रपती शिवाजी विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २० डिसेंबर.

आपल्या जीवन प्रवासात काही दिवस सोन्यासारखे असतात! त्या क्षणांची कधीही किंमत करता येत नाही!  शुक्रवार १६  डिसेंबर हा दिवस– या दिवशी कान्हे तालुका मावळ येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला..

मुलींनी सादर केलेल्या ढोल लेझीमच्या सुंदर प्रसन्न वातावरणात निरंजनाने ओवाळून आमच स्वागत करण्यात आल! अत्यंत देखण्या सभामंडपात उपस्थित झालो! गणराया पासून शिवरायापर्यंत– तसेच आपल्या देशातील विविध प्रांताच्या नृत्यकला संस्कृतीच दर्शन विद्यार्थ्यांनी आम्हाला घडवलं! सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर केलेल्या नृत्यांनी आमच्या डोळ्याचे पारणच फेडलं!

ध्वजारोहण- प्रतिबिंब हस्तलिखित प्रकाशन-विज्ञान प्रदर्शन- रांगोळी प्रदर्शन- चित्रकला हस्तकला प्रदर्शन! अशा विविध उपक्रमांच मान्यवरांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आलं! या सर्व उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांनी घेतलेल्या अविरत परिश्रमाची प्रत्यक्ष पावतीच आम्हाला मिळाली! विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ शाळीग्राम भंडारी म्हणाले की– विद्यार्थी मित्रांनो- आपण खरोखरच भाग्यवान आहात! इतक्या चांगल्या प्रसन्न पवित्र वातावरणात आपल व्यक्तिमत्व सर्वर्थाने विकसित होत आहे! कुठल्याही संघर्षाला -संकटाला तोंड देण्यासाठी आपण सक्षम होणार आहात! आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमुळेच” बलशालीभारत बलवानभारत “-हे माजी राष्ट्रपती अब्दुलकलाम यांच स्वप्न साकार होणार आहे याची मला खात्री आहे!

 

या संस्थेचे अध्यक्ष मा राज्यमंत्री संजय बाळा भेगडे- संस्थेचे चिटणीस संतोषजी खांडगे- शालेय समितीचे अध्यक्ष  यादवेंद्र खळदे- माध्यमिक विभाग प्रमुख. राम कदमबांडेसर! मुख्याध्यापक पांडुरंग ठाकर! शिक्षक प्रतिनिधी. सुमन जाधव- शिबिर प्रमुख सुप्रिया पुंडले! कॉलेज विभाग प्रमुख  श्रद्धा तुपे!  साळुंकेसर आणि  विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!