आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

सृजन नृत्य महोत्सव २०२२..

तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याची आवड रुजावी या साठी गेली २५ हून अधिक वर्षे सृजन नृत्यालय कार्यरत आहे.

Spread the love
सृजन नृत्य महोत्सव २०२२

तळेगाव दाभाडे व मावळ परिसरात भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याची आवड रुजावी या साठी गेली २५ हून अधिक वर्षे सृजन नृत्यालय कार्यरत आहे.

आवाज न्यूज :  विश्वास देशपांडे ,तळेगाव दाभाडे, २० डिसेंबर..

भरतनाट्यम् नृत्य शैलीचे परिपूर्ण शिक्षण देऊन उत्तम कलाकार तयार करणे हे नृत्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट तर आहेच , पण त्याच बरोबर शास्त्रीय नृत्यासाठीचा दर्जेदार रसिकवर्ग निर्माण करणे हे ही आपले कर्तव्य आहे या धारणेतुन सृजन नृत्ययालयाने आज पर्यंत अनेक दर्जेदार कार्यक्रम व नृत्य नाट्ये यांची निर्मिती केली आहे.

या सृजन नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त एका भव्य नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधी हा महोत्सव कलापिनी सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी रोज संध्या. ६ वा. संपन्न होणार आहे. या नृत्य महोत्सवात तळेगावा बरोबरच आंबी, वराळे , वडगाव, कान्हे, कामशेट, इंदुरी , नवालाखउंब्रे, धामणे , सोमाटणे अशा ग्रामीण भागातील विद्यार्थीनी , तसेच गायक , वादक व नाट्य कलाकार असे २५० हुन अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भरतनाट्यम् नृत्य शैलीतील पारंपरिक रचनांबरोबर काही प्रयोगशील रचना, हिंदुस्थानी संगीतावर आधारित काही उपशास्त्रीय रचना ,स्तोत्र , अभंग , कविता , नाट्यगीत , अशा वैविध्य पूर्ण नृत्य रचना सादर होणार आहेत.

महोत्सवाचे उद् घाटन दि. २४ डिसेंबर रोजी होणार असून यासाठी आदरणीय गुरु डाॕ. स्वातीताई दैठणकर ( संगीताचार्य भरतनाट्यम् ) , प्रसिद्ध चित्रकार . रवी देव ( संस्कार भारतीचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य ), मा. डॉ. लक्ष्मी पंडीतधर (Ph. D भरतनाट्यम् ) हे मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तसेच कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे व सा. अंबरचे संपादक . सुरेश साखवळकर हेही या प्रसंगी उपस्थित रहाणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दि. २४ डिसेंबर ला प्रदर्शनीचे
उद्घाटन , हस्तलिखिताचे व अंबर च्या विशेष पुरवणीचे प्रकाशन व काही नृत्य रचनांचे सादरीकरण होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. २५ डिसेंबर ला “मंथन ” या कार्यक्रमात भरतनाट्यम् मधील काही पारंपरिक व काही प्रयोगशील रचनांचे सादरीकरण होणार आहे. तिसऱ्या दिवशी दि. २६ डिसेंबर ला” नृत्यं वंदे ” हा कार्यक्रम सादर होणार असुन यात सृजन नृत्यालय निर्मित विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधील निवडक नृत्य रचना सादर होणार आहेत. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी दि. २७ डिसेंबर ला ११० कलाकारांचे “दुर्गा झाली गौरी ” हे भव्य नृत्य नाट्य नवीन नृत्य रचना व नवीन दिग्दर्शनासहीत सादर होणार आहे तर शेवटच्या दिवशी म्हणजे दि, २८ डिसेंबर ला कलापिनी निर्मित व सृजन नृत्यालय प्रस्तुत ” भाग्ये देखिला तुका ” हे जगद् गुरु संत तुकाराम महाराजांवरील दोन अंकी नृत्य नाट्य सादर होणार आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी असून याला कोणतेही तिकीट किंवा प्रवेशिका नाहीत. तरी सर्व रसिकांनी, नृत्याच्या व संगीताच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सृजन नृत्यालयाच्या संस्थापिका व संचालिका डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!