आरोग्य व शिक्षण

जुन्या अथर्व हॉस्पिटल मध्ये मोफत रुग्ण सेवेस प्रारंभ

Spread the love

तळेगाव : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अथर्व मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या विद्यमाने मोफत जनरल दवाखान्याचे उद्घाटन माननीय आमदार सुनिल आण्णा शेळके आणि ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. सुरेश धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. समाजातील गरजू लोकांना या दवाखान्याचा निश्चितच लाभ होईल असे प्रतिपादन माननीय आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी केले.

या ठिकाणी मोफत जनरल तपासणी,इंजेक्शन व गोळ्या औषधे मोफत देण्यात येतील. ही सेवा कायमची कार्यरत राहील. समाजातील गरजू लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अजित माने व डॉक्टर राजेंद्र देशमुख यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री  बाळा भाऊ भेगडे, माजी उपनगराध्यक्ष  यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्ष  सुरेश धोत्रे, ज्येष्ठ नगरसेवक  चंद्रभान खळदे, पोलीस कमिशनर गुन्हे अन्वेषण पुणे संभाजी कदम,माजी पोलीस उपायुक्त  राम जाधव आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!