आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वडगाव रेल्वे स्टेशनवर पुरूषांसाठी असलेली मुतारी बंद , फलकावरील नावे गायब?

वडगाव रेल्वे स्टेशनवर सुविधा पुरविण्याची नागरिकांची मागणी..

Spread the love

वडगाव रेल्वे स्टेशनवर पुरूषांसाठी असलेली मुतारी बंद , फलकावरील नावे गायब?

वडगाव रेल्वे स्टेशनवर सुविधा पुरविण्याची मागणी..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी२९ डिसेंबर.

वडगाव रेल्वे स्टेशनवर सुविधा पुरविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मळवली ते पुणे या रेल्वेस्टेशनचा कारभार पुणे विभागाकडे असल्याने वडगाव मावळ रेल्वे स्टेशनवर तसेच, सर्व गजबजलेल्या रेल्वेस्टेशनवर सुविधा पुरवाव्यात.

लहानसे चहा स्टाॕल , स्वच्छ मुतारी व पाणी पुरवठा,   स्वच्छतागृह , आणि फुडस्टाॕल , पेपरस्टाॕल येथे चालू करावे..लोणावळा रेल्वेस्टेशनला असे अनेक फुडस्टाॕल आहेत.. तसेच येथे फुडस्टाॕल बसवावेत..

स्वच्छतागृह चालू करावे , वडगाव मावळ या रेल्वेस्टेशनवर पंचायत समिती , तहसिलदार कचेरी ,शाळा महाविद्यालये सञन्यायालय , विद्यार्थी, वकील ,  रजिस्टर ऑफिस, यांचेसह पोलिस अधिकारी , कर्मचारी यांची ये , जा असते.  मळवली, कामशेत , कान्हे , घोरावाडी , बेगडेवाडी  या पुणे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या  एकाही रेल्वेस्टेशनवर  चहास्टाॕल, स्वच्छतागृहे नाहीत.. नागरी  सुविधा पुरवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!