आरोग्य व शिक्षणदेश विदेश

पुणे-जोधपूर रेल्वेसेवा दररोज सुरु करावी..आईमाता सिरवी (समाज ट्रस्ट)

आईमाता सिरवी (समाज ट्रस्ट) व चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी निवेदन दिले.

Spread the love

पुणे-जोधपूर दररोज सुरु करावी तसेच, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण आदी मागण्यांसाठी आईमाता सिरवी (समाज ट्रस्ट) व चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी निवेदन दिले.

आवाज न्यूज: चिंचवड प्रतिनिधी २९ डिसेंबर.

पिंपरी चिंचवड शहर जगविख्यात औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या आज 28 लाखाहून अधिक आहे. पुणे शहराची लोकसंख्या अंदाजे 38 लाखाच्या आसपास आहे. त्यापैकी कुमावत, राजस्थानी, गुजराती, चौधरी, अंजना पटेल, प्रजापत, देवासी, घाँसी आदी समाजाची पुणे पिंपरी चिंचवड शहरात 10 लाखांच्या आसपास लोक संख्या असून त्यांना त्यांच्या कुटूंबियांनी भेटण्यासाठी तसेच, व्यवसायासाठी नियमित ये-जा करावी लागते. सध्या पुणे जोधपूर ही रेल्वे सेवा आठवड्यातून एकदाच सुरू असून ती दररोज चालू करावी, यासाठी गेली अनेकवर्षे समाजाच्या वतीने पुणे जिल्हा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष हरिष वर्मा, कुमावत समाजाचे अध्यक्ष भावेष कुमावत, पुनाराम गेहलोत, हिरालाल चौधरी, लालाराम पटेल, हिम्मत घाँसी आदींनी तसेच, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा आदींनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी भेट घेवून लेखी निवेदन दिले.

यावेळी पुणे जिल्हा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष हरिष वर्मा म्हणाले, राजस्थान परिसरात विविध समाजाचे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात लोक वास्तव्यास आहेत. त्यांना नियमित राजस्थान प्रदेशात त्यांच्या मुळगावी ये-जा करावी लागते. सध्या पुणे-जोधपूर आठवड्यातून एकदाच धावते, ती दररोज सोडण्यात यावी, खाजगी गाड्याने ये-जा करणे परवडत नाही, जर रेल्वे विभागाने लक्ष दिले नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असे समाज बांधवांना सांगितले.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार म्हणाले,
महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, बीड, लातूर, कोकण, मुंबई, सोलापूर आदी भागातील 8 लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. कमी कालावधीत उद्योग व्यवसाय वाढीमुळे दिवसेंदिवस या शहरात प्रचंड लोक नोकरी, व्यवसायाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. दररोज 150 हून अधिक एक्सप्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. पुणे येथे किंवा कल्याण, दादर, पनवेल येथे जावून पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आज येत आहे. पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढसाठी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने 1989 सालापासून प्रयत्न करीत आहे. रेल्वे अधिकार्यांना भेटले असता निधी उपलब्ध नाही, मुंबईतच लोकल कमी पडतात, लोकल रेक (युनिट लोकल) उपलब्ध झाल्या तर, पुणे-लोणावळा दरम्यान नवीन लोकलवाढ करू असते सांगितले. गेल्या 35 वर्षात रेल्वे मंत्री, मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्या बरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत असताना रेल्वे विभागाकडून अनेकवेळा लेखील पत्र व आश्वासनच मिळाले.

अशातच जानेवारी 2020 साली मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, राज्य शासनाने पुणे-लोणावळा दरम्यान 63 किलोमीटर रेल्वे मागावर तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण 4300 कोटी रूपयांच्या खर्चापैकी पुणे महानगरपालिकेने 375 कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 250 कोटी रूपयांचा खर्च उचलणे बंधनकारकच आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जावू शकतो पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही, असे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. दोन्ही महापालिकेने देखील आजतागायत रेल्वेला आर्थिक मदत केली नाही. पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के रेल्वे प्रवासीयांवर अवलंबून आहेत. त्याचा विचार केला पाहिजे, अशी विनंती खासदार श्रीरंग बारणे यांना केली. पुणे लोणावळा दरम्यान सध्या लोकल उशिरा धावत असून चौपदरीकरण होणे काळाची गरज असून महाविद्यालयांच्या पत्रकाबरोबर सह्यांची मोहिम राबविणार आहोत. तसेच पुणे जोधपुर, इतर लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना चिंचवड येथेही थांबा मिळावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली.

यावेळी खासदार बारणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, वरील मागण्यांचा पाठपुरावा तातडीने महिन्याभरात रेल्वे मंत्र्यांबरोबर व्यक्तिशः आपण दिलेले निवेदन त्यांच्या नरजसेच आणून देवून प्रवासीयांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!