आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

शिवपिंडीला दह्या दुधाचे अभिषेक करणारे हजारो आहेत…

हिंदवी स्वराज्याचे स्थापनेसाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारे एकमेव छञपती. शिवाजी महाराज.:ह.भ.प.समाधान महाराज शर्मा.

Spread the love

शिवपिंडीला दह्या दुधाचे अभिषेक करणारे हजारो आहेत; हिंदवी स्वराज्याचे स्थापनेसाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारे एकमेव छञपती शिवाजी महाराज.:ह.भ.प.समाधान महाराज शर्मा.

आवाज न्यूज : कामशेत प्रतिनिधी, ५ जानेवारी.

शिवपिंडीला दह्या दुधाचे अभिषेक करणारे हजारो आहेत; हिंदवी स्वराज्याचे स्थापनेसाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारे एकमेव छञपती शिवाजी महाराज. होय. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.आणि ३६ वर्षे चारही पातशायांशी झुंज देवून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे :ह.भ.प.समाधान महाराज शर्मा म्हणाले.कामशेत येथे आमदार सुनिलआण्णा शेळके यांच्या श्री विठ्ठल परिवाराचे तर्फे ता.३१ डिसेंबर २२ ते ४ जानेवारी २०२३ या काळात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी. ह.भ.प.समाधान महाराज  बोलत होते.

पहिल्या दिवशी ह.भ.प.सुदाम महाराज सानप , दुसऱ्या दिवशी  ह.भ.प. जयवंत महाराज बोधले , तिसऱ्या दिवशी ह.भ.प.माऊली महाराज कदम आणि चवथ्या दिवशी ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील यांची कीर्तनसेवा झाली.ता.४ रोजी काल्याचे किर्तनाआधी कामशेत येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून मावळातील दिंड्यांनी पालखीतून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महारज प्रतिमेची व ग्रंथांची टाळमृदूंगाच्या तालात मिरवणूक काढली .यावेळी काल्याचे किर्तनात श्री.शर्मा महाराज म्हणाले.

” आज काल ढाब्यावर चुलीवरची भाकरी मिळेल;आईचे हातची भाकरी नाही मिळणार! आज समाजात काही गोष्टी कमी होत आहे , संस्कार मुलामुलींचेवर करणे , फार गरजेचे आहे.

हा कीर्तन महोत्सव कामशेतला होत नसून पंढरपूर चे वाळवंटात होत आहे , असे इथले भव्यदिव्य मंडप व सजावट यावरून वाटते.मी अनेक ठिकाणी भव्यदिव्य सोहळे पाहिले , पण आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी खरोखर सुंदर वातावरण निर्मिती केली आहे , असे जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी कीर्तनात सांगितले.
शनिवारी सुरू झालेल्या या कीर्तन महोत्सवाची सांगता ता. ४जानेवारी असे पाच दिवस श्री विठ्ठल परिवारातर्फे आयोजित केलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाची सांगता ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तनाने झाली.

यावेळी ते याल तरी यारे लागे , आवघे माझ्या मागेमागे । । या गवळणीवर काल्याचे कीर्तन करताना बोलत होते.

यावेळी महाराजांचा सत्कार जेष्ठ सहकार महर्षी माऊली दाभाडे आणि ज्येष्ठ समाजसेवक व आमदार सुनिलआण्णा शेळके यांचे वडील. शंकरराव शेळके यांचे हस्ते करण्यात आला..यावेळी श्री विठ्ठल परिवारचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुनिलआण्णा शेळके, श्रीविठ्ठल परिवार जप विभाग अध्यक्ष .नितीन महाराज काकडे , श्री विठ्ठल परिवार अध्यक्ष ह.भ.प.गणेशमहाराज जांभळे , श्री विठ्ठल परिवार कीर्तन महोत्सव आध्यक्ष ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे तसेच मावळ तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे , तसेच तालुका राष्ट्रवादीचे खजिनदार सुभाष जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक सुधाकर शेळके यांनी सर्व , कार्यकर्त्यांचे सहकार्याने जेवण बनवणे , वाढणे आणि मंडपातील व्यवस्था केली होती.

यावेळी श्री शर्मा महाराज यांनी पंडीत भीमसेन जोशी यांचे आवाजात अभंग तसेच शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे आवाजाची नक्कल करत शिवाजी महाराजांच्या जिवनावर पोवाडा गात श्रोत्यांना मंञमुग्ध केले. ते म्हणाले शिवा काशीद सारखे वीर मृत्यास घाबरले नाहीत.तो महाराजांचा अंगरखा घालून मृत्यूला हसत हसत सामोरा गेला. तो म्हणाला , माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील , लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मरण पत्करून अमर होईल..आणि त्याने हसत हसत दिलेरखानाची समशेर पाठीवर नाही छातीवर घेतली , असे वीर मावळे छञपतींचे सोबती होते , म्हणून स्वराज्य उभे राहिले.

ते म्हणाले , ‘ गोपाळांना घेवून कृष्णाने गोकुळात श्रीकृष्ण बालगोपाळ चौर्य मंडळ स्थापन केले.गवळणी रक्षण करत असलेल्या दही , दूध , लोणी , यांची चोरी केली.सर्वांना खाऊ घातले..यावेळी गवळणी मडकी ठेवलेल्या शिंक्याला घंटी बांधत असत.त्या घंटीला सांगितले , आजिबात वाजू नको , नाहीतर सर्व भारतातीला मंदिरातून तुला हद्दपार करीन..तसेच झाले , घंटी वाजली नाही.शेवटी कृष्णाने बोटावर असलेल्या लोण्याला ओठांना लावताच घंटीने वाजायला आरंभ केला.जगाचा बाप जर तृप्त होत असेल , तर मी का गप्प राहू , मी वाजणारच ! असे ती म्हणाली.
पंढरपूर ला जाताना आपण झपाझप चालत असतो..एकामागून एक थोडे अंतर पडले , की आपण मागे राहतो.! तसे याल तरी या रे लागे ! तरच तुम्हाला लोणी खायला भेटेल..! आणि पांडुरंगाची भेट होईल..जीवन धन्य होईल..! अत्यंत सुश्राव्य किर्तन करताना महाराज म्हणाले ,
असा सोहळा भगवानगडावर होतो ! अनेक ठिकाणी होतो , पण याचे व्यवस्थापन अत्यंत सुंदर आहे ! !
यावेळी सूञसंचालन ह.भ.प.नितीन महाराज काकडे आणि ह.भ.प.गणेशमहाराज जांभळे यांनी केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!