आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

अंगारकी चतुर्थी लोणावळा शहरातील गणपती मंदिरात भजन व विविध कार्यक्रमांनी साजरी.

Spread the love

अंगारकी चतुर्थी लोणावळा शहरातील गणपती मंदिरात भजन व विविध कार्यक्रमांनी साजरी.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी . ११ जानेवारी.

अंगारकी चतुर्थी लोणावळा शहरातील गणपती मंदिरात भजन व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात देवले येथील श्री भैरवनाथ भहिला भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

अंबरवाडी येथील श्री सिध्दीविनायक गणेश मंदिरात भाविकांकडून रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी देवस्थानचे विश्वस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वर्तक , तसेच माजी नगरसेविका श्रीमती शशी धृव आगरवाल , तसेच शेकडो भाविक उपस्थित होते.
गवळीवाडा येथे आयोजित अंगारकी चतुर्थीचे नियोजन माजी नगरसेवक ह.भ.प.भिकुदादा तथा दिलीपशेठ लोंढे , पिंगळे तात्या , श्रीराम क्रिडा मंडळाचे अध्यक्ष महादू शेठ गवळी आदींनी केले.

यावेळी नवमी भजनी मंडळाचे सभासद व पदाधिकारी ह.भ.प.खंडू कंधारे , ह.भ.प.भिवाजी गायखे , तसेच मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!