आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालकांसाठी मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.

या वर्षातील संदर्भित बालकांसाठी संदर्भसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते "सदर शिबीरामध्ये एकूण १९३ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

Spread the love

बालकांसाठी मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ जानेवारी.

लहानपणीच वेळेवर लवकर निदान लवकर उपचार या सूत्रीमुळे सक्षम पिढी तयार होण्यास मदत होते. मावळ तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यासाठी करीत असलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे असे उद्गार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी, वैशालीताई दाभाडे यांनी काढले.

दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ अधिनस्त राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यात 4 पथक आहेत, या अंतर्गत अंगणवाडी व शाळेची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते ,त्यातील संदर्भित बालके संदर्भसेवा पूर्ण झालेली सन २०१३ ते अद्यापपर्यंत.

१)हृदय शस्त्रक्रिया =५७
२)अपेंडिक्स शस्त्रक्रिया =५४
३)दुभंगलेले टाळू शस्त्रक्रिया=२८
४)कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया =३१
५)सिस्ट शस्त्रक्रिया=२४
६)तिरळेपणा शस्त्रक्रिया=३२
७)टंगटाय शस्त्रक्रिया=३७
८)टॉन्सिल शस्त्रक्रिया=१६
९)हर्निया शस्त्रक्रिया=४१
१०)फायमोसिस शस्त्रक्रिया=४६
११)ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया=२६
*१२)कॉक्लीअर इंप्लान्ट शस्त्रक्रिया=03*
१३)कुपोषित बालकांवर उपचार=६१०
(सॅम=१५७ मॅम=४५३)

या वर्षातील संदर्भित बालकांसाठी संदर्भसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते “सदर शिबीरामध्ये एकूण १९३ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.जयश्री ढवळे मॅडम व वैशालीताई दाभाडे अध्यक्षा इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी केले.

सदर शिबिरातील लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे ,ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ ,उपजिल्हा रुग्णालय लोणावळा येथील तज्ञ डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले.सदर शिबिरात १)बालरोगतपासणी २)कान नाक घसा तपासणी ३)दंत रोग तपासणी ४)नेत्र तपासणी ५)आहार सल्ला व समुपदेशन ६)प्रयोगशालीन परीक्षण ७)औषधी वाटप इत्यादी सेवा मोफत देण्यात आल्या आहेत.शिबिर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शशांक धंगेकर यांनी केले. याप्रसंगी मा. डॉ.दर्पण महेशगौरी वैद्यकीय अधिक्षक मायमर मेडिकल कॉलेज तसेच,ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

आभारप्रदर्शन डॉ.पद्मवीर थोरात यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मनीषा गावंडे यांनी केले.

सर्वांचे मन:पूर्वक आभार.
मा.जिल्हाशल्यचिकित्सक,औंध जिल्हा रुग्णालय,पुणे.
मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वडगांव मावळ.
मा.तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती वडगांव मावळ.
मा.बालविकास प्रकल्प अधिकारी आय.सी.डी.एस. विभाग,पंचायत समिती वडगाव मावळ.
सर्व अधिकारी कर्मचारी ग्रा.रु.वडगांव मावळ.
सर्व अधिकारी कर्मचारी आर.बी.एस.के. ग्रा.रु.वडगांव मावळ.
सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका, मदतनीस.
सर्व लाभार्थी व त्यांचे पालक.

विशेष सहकार्य.
मायमर मेडिकल कॉलेज, तळेगांव दाभाडे, उपजिल्हा रुग्णालय लोणावळा,इनरव्हील क्लब,तळेगांव दाभाडे,
लायन्स क्लब वडगाव,सेव द चिल्ड्रेन, मावळ, जि.प.प्रा.शाळा, कान्हे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!