आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘कार्यकारिणी शिबिर-२०२३ हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाला.

अशा शिबिरांमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य मार्गदर्शन मिळुन भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल भक्कमपणे यशस्वीतेकडे अशीच सुरु राहील. सुनिल शेळके, आमदार मावळ.

Spread the love

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘कार्यकारिणी शिबिर-२०२३’ आज हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाले.

आवाज न्यूज : का‌मशेत प्रतिनिधी, २३ जानेवारी.

संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, नगरसेवक, बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून मार्गदर्शन शिबिरास सुरुवात करण्यात आली. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुनील शेळके यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते,रायगड लोकसभेचे खासदार.सुनिलजी तटकरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष.रविकांतजी वरपे, दैनिक सकाळच्या संपादक.शितलताई पवार, ओबीसी आरक्षण अभ्यासक.हरीजी नरके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजीअध्यक्ष.बबनराव भेगडे, इतिहास संशोधक प्रा.इंद्रजीतजी सावंत, प्रसिद्ध शाहीर.राजेंद्रजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष.प्रदीपदादा गारटकर या मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना यावेळी मार्गदर्शनकेले.

अशा शिबिरांमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य मार्गदर्शन मिळुन भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल भक्कमपणे यशस्वीतेकडे अशीच सुरु राहील,अशी आशा बाळगतो, असे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!