ताज्या घडामोडी

बळवंत कॉलेजमध्ये “स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन” या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

Spread the love

बळवंत कॉलेजमध्ये “स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन” या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत कॉलेज विटा येथील कॉमर्स आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने “स्टार्ट- अप आणि इनोव्हेशन: समस्या व आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी एकूण २० प्राध्यापक व संशोधकांनी आपले संशोधन पेपर सादरीकरण केले. तसेच या परिषदेला एकूण ७० प्राध्यापक व संशोधक उपस्थित होते. परिषदेमध्ये पहिल्या सत्रात डॉ. आर. एस. साळुंखे प्राचार्य आर्ट्स कॉमर्स कॉलेज पलूस जि. सांगली यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात मा. शिवाजीराव ठोंबरे, कृषी तज्ञ्ज कराड यांनी अभ्यासपूर्ण माहितीचे सादरीकरण केले. या चर्चासत्रामध्ये नवउद्योजकासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना, सरकारचे उपक्रम, निधी, कृषिआधारित उद्योग इत्यादी घटकावर सविस्तर चर्चा झाली. या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचे मार्दर्शन लाभले. कार्यशाळेचे संयोजक म्हणून डॉ. श्रेया पाटील ( विभागप्रमुख कॉमर्स आणि व्यवस्थापन, समन्वयक आय. क्यू. ए.सी.) तर समन्वयक म्हणून श्रीमती राणी चव्हाण यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!