आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नविन समर्थ विद्यालयातील,  १९८७ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

विद्यार्थ्यांनसोबत त्या वेळच्या शिक्षकांनी देखील हजेरी लावत आपल्या आठवणी जाग्या केल्या.

Spread the love

नविन समर्थ विद्यालयातील,  १९८७ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

विद्यार्थ्यांनसोबत त्या वेळच्या शिक्षकांनी देखील हजेरी लावत आपल्या आठवणी जाग्या केल्या.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर ‌२६ जानेवारी.

७४ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नविन समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात पडल्यानंतर जुने शालेय जीवनातील मित्र व मैत्रिणींनी आणि शिक्षकांनी आपल्या समर्थ विद्यालयात १०वी अ च्या वर्गात छानसा कार्यक्रम केला.

जे आपले जुने शालेय जीवनातील मित्र व मैत्रिणींनी आणि शिक्षकांनी आपल्या समर्थ विद्यालयात येऊन आपला वेळ देऊन ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. तसेच मोरे मॅडम, गावडे मॅडम आणि केतकर मॅडम यांनी १०वी अ च्या वर्गात येऊन आपल्या सगळ्यांना वेळ देऊन छान मार्गदर्शनकेले.

केतकर मॅडम, मोरे मॅडम आणि गावडे मॅडम यांचा सत्कार  माजी विद्यार्थीनी हेमा हेंद्रे आणि निर्मला दाभाडे यांनी केला.

कार्यक्रमानंतर चहा व नाष्ट्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाला हेमा, निर्मला, बाळु भोसले,विठ्ठल कदम , रघुनाथ ठाकर यांनी लोणावळा चिक्की आणि चॉकलेट फज आणून सगळयांचे तोंड गोड केल्याबद्दल त्याचे व विलास चव्हाण,सुनिल ढोरे, आनंदा पाटोळे, शशिकांत ओव्हाळ, बाळु ढोरे, संजय पानसरे , दत्ता कार्के यांनी ही वेळ काढून आल्याबद्दल आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करून शोभा वाढवली याबद्दल त्यांचे मोहन महामुनी यांनी उपस्थिती बद्दल सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!