आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणावळा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे मेळावा उत्साहात संपन्न ..

लोणावळ्याच्या विद्या प्रसारिणी सभेत दीड ते दोन हजार माजी विद्यार्थी रमले भूतकाळात ! !

Spread the love

लोणावळा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे मेळावा उत्साहात संपन्न ..

लोणावळ्याच्या विद्या प्रसारिणी सभेत दीड ते दोन हजार माजी विद्यार्थी रमले भूतकाळात ! !

 आवाज न्यूज लोणावळा  प्रतिनिधी ३१ जानेवारी.

लोणावळा येथील विद्या प्रसारिणी सभेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी विद्यार्थी संघाने संपूर्ण विद्यालयाला पुरेल इतकी सौरउर्जेवर चालणारे पॕनेल बसविण्याचा व विद्यालयाचे विद्यार्थांना शिक्षणासाठी संगणक देण्याचे जाहीर करण्यात आले.

यासाठी माजी विद्यार्थी संघातर्फे सुमारे पन्नास लाख निधी उभारण्यात येणार असे माजी विद्यार्थी संघातर्फे निखिल कविश्वर यांनी सांगितले. तसेच बाळासाहेब पायगुडे , रमेश लुणावत , यांनी याबाबत माहिती दिली.
सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन विद्या प्रसारिणी सभेचे ॲड. सचिव. सतिश गवळी यांचे हस्ते झाले. यावेळी शालेय समितीचे स्थानिक पदाधिकारी अरविंदभाई मेहता , सामाजिक कार्यकर्ते धिरूभाई टेलर , प्राचार्या.अंजना गानू , विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक भगवान आंबेकर , तसेच माजी प्राचार्य रामदास दरेकर , स्थानिक कमिटीचे पदाधिकारी कन्हैया भुरट , माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख पदाधिकारी उमेश तारे , महेंद्र कांकरिया , निखिल कविश्वर , दत्ताञेय येवले , रमेश लुणावत , बाळासाहेब पायगुडे , ललित सिसोदिया , गिरीशजी पारख , प्रकाशा गोणते , विनायक देशपांडे , वसुधा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी १९३२ ते २०२२ पर्यतचे माजी विद्यार्थी यांच्या अनेक बॕचचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना रमेश लुणावत यांनी संस्थेच्या प्रारंभापासून माहिती दिली. सुरूवातीस १९२१ मधे नगरपरिषद शाळा असताना ती वि.प्र.सभेकडे १९३१ मधे लीजवर वर्ग करण्यात आली. १९३१-३२ ते २०२२ पर्यतच्या मुख्याध्यापक , व तत्कालीन नगराध्यक्ष याबाबत माहिती दिली. सध्या सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत , असे सांगितले.

 

यावेळी सूञसंचालन माजी मुख्याध्यापिका वसुधा पाटील यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी संघातर्फे गुरूपूजन कार्यक्रम स्काऊटचे विद्यार्थ्यांचे बँडपथकाने स्वागत करून करण्यात आला..यावेळी माजी नगराध्यक्ष मो.म.आगरवाल , चंद्रकांत शहा , , माजी शालेय समिती सदस्य बच्चूभाईं पञावाला , , तसेच माजी मुख्याध्यापक दि.बा.कुलकर्णी ,  यांचा उल्लेख करण्यात आला..
यावेळी माजी विद्यार्थांना सेवानिवृत्त प्राचार्य रामदास दरेकर यांनी उत्तर दिले.

प्रमुख पाहुणे विद्या प्रसारिणी सभेचे सचिव सतिश गवळी , व वरिष्ठ लिपिक यांचेकडून माजी विद्यार्थी संघाचे कौतुक करण्यात आले..शेकडो माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी गप्पागोष्टी , फोटोग्राफी , सेल्फी , मिष्ठान्न बुफे जेवण यामधे रमले..जुन्या आठवणी व नातवंडे , सुना , मुलांच्या प्रगतीबाबत , करिअरबाबतच्या गप्पागोष्टी मधे रमून गेलेले दिसले..
आभार दत्ताञेय येवले यांनी मानले..राष्टगीताने आणि स्वागतगीताने कार्यक्रम सुरू झाला..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!