आरोग्य व शिक्षणदेश विदेशमहाराष्ट्र

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी..

संत तुकोबारायांचे दर्शन, भजनसेवा,  कीर्तनसेवा, महाप्रसादाचा घेतला लाभ..

Spread the love

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी

संत तुकोबारायांचे दर्शन, भजनसेवा,  कीर्तनसेवा, महाप्रसादाचा घेतला लाभ..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ३ जानेवारी.

‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी माघ शुद्ध दशमीच्या दिवशी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेत असंख्य भाविकांनी संत तुकोबारायांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

माघ शुद्ध दशमीनिमित्त दुपारी १२ वाजता गणेशमहाराज शिंदे व सन्मिता शिंदे यांचा मोगरा फुलला हा अभंगवाणीचा संपन्न झाला. तर, दुपारी २ वाजता प्रसिद्ध भारूडकार लक्ष्मणमहाराज राजगुरू (इंदापूर) यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही कार्यक्रमांचा भाविकांनी आनंद घेतला. सायंकाळी हभप पंकजमहाराज गावडे यांची कीर्तनसेवा झाली. या वेळी असंख्य भाविकांनी कीर्तनसेवा श्रवण केली.

 

दशमीच्या दिवशी माजी आमदार कृष्णराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे दर्शन घेतले. संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, आमदार सुनील शेळके
यांनीही संत तुकोबारायांचे दर्शन घेतले.

सप्ताह काळात दरवर्षी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतून असंख्य भाविकानी डोंगरावर हजेरी लावली.

बुधवारी हभप बाळकृष्णमहाराज वसंतगडकर यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती. तसेच, सप्ताह काळात हभप ज्ञानेश्वरमहाराज वाघ है। निरूपण करत असलेल्या कैवल्यमूर्ती संत ज्ञानेश्वर महाराज या कथेचा समारोप करण्यात आला. गुरुवारी (दि. २) सकाळी १० वाजता डॉ. विकासानंदमहाराज मिसाळ (नगर) यांचे काल्याचे कीर्तनसेवेने सप्ताहाची सांगता झाली.असून,दररोज महाप्रसादाची व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी करण्यात येत असंख्य भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!