आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

देहूरोड, गुन्हे शाखा युनिट पाचची उलेखनीय कामगीरी. कोयता घेऊन दहशत मोजविणाऱ्या दोन गुंडांना केले जेरबंद.

एकूण पाच हत्यार जप्त, भारतीय हत्यार कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल, तीन विधीसंघर्षित बालक ताब्यात.

Spread the love

देहूरोड, गुन्हे शाखा युनिट पाचचे उलेखनीय कामगीरी देहूरोड बाजारपेठेत कोयता घेऊन दहशत मोजविणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखा पथकाने केले जेरबंद.

एकूण पाच हत्यार जप्त, भारतीय हत्यार कायदे प्रमाणे गुन्हा दाखल, तीन विधीसंघर्षित बालक ताब्यात.

आवाज न्यूज : देहुरोड प्रतिनिधी, ३ जानेवारी.

देहुरोड – दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना मनोज खंडाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड तसेच पोलीस उपनिरीक्षक कोळी, सहायक पोलीस फौजदार किरनाळे, पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई खेडकर, पोलीस शिपाई माने, पोलीस गुन्हे शाखेच्या वरिष्ठ आदेशान्वये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने लॅपटॉप व इतर जप्ती साठी लागणारे साहित्य घेऊन खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सर्वांना उपहार गृह येथे आले असता पोलीस हवालदार बनसोडे व पोलीस शिपाई गाडेकर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की देहूरोड बाजार पेठ गणपती मंदिरा जवळ चार ते पाच इसम कोयता व तलवारी सारखे लोखंडी हत्यारे हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे अशी माहिती मिळताच वरील पोलीस पथक असे पेट्रोलिंग करत असलेल्या खाजगी वाहनाने सदर ठिकाणी गेले असता पोलीस पथकास पाहून काही इसम तेथून अंधाराच्या दिशेने पळून जाऊ लागले पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने पोलीस पथकाने आरोपी नावे अल्ताफ असलम रंगरेज (वय वर्ष २२ रा. आंबेडकर नगर देहूरोड तालुका हवेली जिल्हा पुणे) जैद रशीद खान (वय १८ रा. शितळा नगर नंबर एक शितळादेवी मंदिराच्या पाठीमागे देहूरोड तालुका हवेली जिल्हा पुणे) व इतर तीन विधीसंघर्षित बालकांना शिताफीने ताब्यात घेऊन सदर इसमांना आहे त्या स्थितीत ठेवन सपोफो पोलीस किरनाळे यांनी त्यांची एकापाठोपाठ एक अशी पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांच्या कडून दोन लोखंडी कोयते, दोन लोखंडी तलवार व एक गुप्ती वरील आरोपी व विधीसंघर्षित बालक यांच्या कब्जात मिळून आल्याने ते सहायक पोलीस फौजदार किरनाळे यांनी पंचा समक्ष जप्त केले.

आरोपी नामे अल्ताफ असलम रंगरेज वय २२ भाजी मंडई धंदा भाजी विक्री आंबेडकर नगर देहूरोड जैद रशीद खान वय १८ शीतला नगर नंबर एक शीतला नगर, व तीन विधीसंघर्षित बालक हे आपले जवळील हत्यारे विनापरवाना बेकायदेशीर जवळ बागळून लोकांमध्ये दहशत करीत असताना मिळून आले त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) ( ३) चे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा क्रमांक ३७(१)( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेआहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहायक पोलीस आयुक्त मनोज लोहिया अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या आदेशाप्रमाणे व सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी सपोफौ किरनाळे, पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई खेडेकर, पोलीस शिपाई माने, पोलीस शिपाई
गाडेकर व पोलीस शिपाई कुट्टे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!