आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडेच्या फ्रेन्ड्स ऑफ नेचर संस्थेचे सामाजिक भान .

लिंब फाटा येथे उच्च दर्जाचे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवून लोकार्पण केले........

Spread the love

तळेगाव दाभाडेच्या फ्रेन्ड्स ऑफ नेचर संस्थेचे सामाजिक भान .
लिंब फाटा येथे उच्च दर्जाचे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवून लोकार्पण केले……..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विश्वास देशपांडे वार्ताहर …दि. ४ फेब्रुवारी २०२३.

पोलीस स्टेशन ,तळेगाव दाभाडे यांचे विनंतीस मान देऊन व सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन, फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेने लिंब फाटा येथे ऊच्च दर्जाचे सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

हे कॅमेरे स्वतंत्र एफ.टी. टी.एच (FTTH ) इंटरनेट च्या माध्यमातून पोलिस स्टेशन येथील कंट्रोल रुमला जोडलेले आहेत. या ठिकाणचे १२दिवस आधिपर्यंत चे कोणतेही फुटेज पोलिस तत्काळ पाहू शकतील.इतकेच नव्हे तर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाईल वर ही याचे कनेक्शन दिलेले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण वरिष्ठ पोलिस निरीक्षक  जवदवाड यांचे हस्ते होणार होते परंतू त्यांना अचानक कमिशनर ऑफिसमधे जावे लागल्याने ते ऊपस्थित राहूशकले नाहीत.

हे लोकार्पण आज दि. ४ फेब्रुवारी रोजी दु २ वाजता पोलिस हवालदार सुनील तळपे, पोलिस नाईक प्रशांत वाबळे, महिला पोलिस नाईक वैशाली बोरकर, कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे यांचे ऊपस्थितीत श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी फ्रेन्ड्स ऑफ नेचर चे अध्यक्ष निरज शाही, संस्थापक अध्यक्ष महेश महाजन, माजी अध्यक्ष विवेक रामायणे, निशिकांत पंचवाघ, सुधाकर मोरे, दिपक शिरसाठ, राकेश बागुल, किरण मोकाशी व इतर सदस्य ऊपस्थित होते.

पोलिस अधिकारी प्रशांत वाबळे यानी या कॅमेर्‍या मुळे अपघाताचा छडा लावणे व साखळी चोरांचा तपास करणे सुलभ होईल असे सांगून फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेचे आभार मानले. महेश महाजन यांनी याची सर्व देखभाल नियमीत पणे केली जाईल व मासिक इंटरनेट चा खर्च ही संस्थेकडूनच केला जाईल असे सांगितले. २०२३ हे फ्रेन्ड्स ऑफ नेचर या संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे या वर्षात असेच विविध सामाजिक आणि निसर्ग संवर्धनाचे विविध उपक्रम केले जाणार आहेत असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!