ताज्या घडामोडी

ग्लोबल ट्रिंफ स्टार्टअप समिट २०२२ मुंबई येथे संपन्न.

Spread the love

दिनांक २५ जून रोजी मुंबई स्थित हॉलिडे इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक तथा औद्योगिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेच्या अंतर्गत अत्यंत मानाचे मानले जाणारे शैक्षणिक पुरस्कार मान्यवर शिक्षणसेवकास प्रदान करण्यात आले. यात प्रामुख्याने, क्युट स्माईल प्रीस्कूल आणि डे केअरच्या श्रीमती बिना सिंह, ऑयस्टर इंग्लिश मीडियम स्कूल संचालिका सौ.फरहीन हारून शेख, मास्टर्स अकॅडमी संचालिका नेहा खरे, व्ही. इंनोवेशन एज्युकेशन संचालिका डॉ.मधुमती जगदाळे,
वंडर वल्ड प्रि-स्कुल संचालिका सौ. सोनिया अनिल सुद्रिक या पुण्यात स्थित मान्यवरांचा तर ओडिसा भुवनेश्वर येथील श्रीमती निलिमा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. लहान मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व शिक्षण सेवक सदैव कार्यरत राहतील अशी शुभकामना यावेळी प्रमुख अतिथी मान्यवरांनी व्यक्त केली. विजन एज्युकेशन डेडिकेशन फाउंडेशन विश्वस्त स्वप्निल राणी नंदकुमार यावेळेस विशेष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!