आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

वंदे मातरम एक्सप्रेसवर चिंचवड येथे पुष्पांची बरसात..

दर ५० टक्के कमी करावे ः चिंचवड प्रवासी संघ..

Spread the love

 सामाजिक : वंदे मातरम् एक्सप्रेसवर चिंचवड येथे पुष्पांची बरसात, दर ५० टक्के कमी करावे ः चिंचवड प्रवासी संघ.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १० फेब्रुवारी.

 

चिंचवड रेल्वे स्थानकात आज मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस भारत चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. आज संध्याकाळी ६. ३८ च्या सुमारास चिंचवड रेल्वे स्थानकात आगमन होताच चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी निर्मला माने, संगीता जाधव, प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राधिकरण येथील वंडरकिड्स शिशु वर्गाच्या मुख्याध्यापिका स्वामी मुथा त्यांच्यासमवेत शिक्षक विद्यार्थी, पालक समवेत रेल्वेस्थानकावरील रेल्वे कर्मचारी, प्रवासी तसेच, रेल्वेस्थानक प्रमुख सुनील नायर आदींनी वंदे मातरम् एक्सप्रेसवर पुष्पांची बरसात करून तिचे स्वागत केले.

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने या वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करीत आहे. ही गाडी पूर्ण वातानुकूलीत असून मुंबई ते सोलापूर ४५५ कि.मी. चा पल्ला १६० कि.मी. ताशी वेगाने अवघ्या ६ तासात पोहचणार आहे. या गाडीचे तिकीट दर अंदाजे मुंबई ते सोलापूर एक्झिक्युटीव्ह चेअर कार तिकीट दर २३५० तर, एसी चेअर कार १३०० रु. दर आहे. तसेच, पुणे ते सोलापूर एक्झिक्युटीव्ह चेअर कार तिकीट दर १६४५ तर, एसी चेअर कार ९३० प्रति प्रवासी आहे. हा दर सर्वसामान्यांना न परवडणारा दर आहे.

मध्यमवर्गीय सर्वसामान्य प्रवासी कुटूंबासमवेत प्रवासच करू शकणार नाही. आज अनेक उद्योजक विमानाने किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना आढळून येतात. जर, या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासीयांनी मोठ्या संख्येने मुंबई ते सोलापूर प्रवास केला नाहीतर तातडीने तिकीटाच्या दरात ५० टक्के कपात करावी, सध्या १६ डब्बे ट्रेनला असून, मध्यमवर्गीयांसाठी पाच डब्बे जोडण्यात यावे, त्यांच्याकडून सर्व साधारण एक्सप्रेसचे दर आकारण्यात यावे, अशी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने सदर मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात येत आहे.

तसेच, मुंबई ते सोलापूर, मुंबई-पुणे, पुणे सोलापूर या दरम्यान सर्वसामान्य व मध्यम वर्गीयांसाठी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्या, तसेच चिंचवड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!