आरोग्य व शिक्षण

वैष्णवी सचिन टकले यांची बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड .

बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या संस्थापिका, मा. नगराध्यक्षा. चित्राताई संदिप जगनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती व्ही. जे. तळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली..

Spread the love

वैष्णवी सचिन टकले यांची बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १० फेब्रुवारी.

बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या संस्थापिका, मा. नगराध्यक्षा. चित्राताई संदिप जगनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती व्ही. जे. तळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत  वैष्णवी सचिन टकले यांची बलुतेदार महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी. वर्षाराणी दर्शन गुंड तर सचिव पदी. वैशाली सतीश राऊत यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदिप जगनाडे, मा. सभापती महेंद्र पळसे, मा. सदस्य सतिश राऊत, मा. नगरसेवक सचिन टकले तसेच सर्व नवनिर्वाचित संचालिका उपस्थित होत्या.

 

सर्व नवनिर्वाचित संचालिकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्षा. वैष्णवी टकले, मा. नगराध्यक्षा. चित्राताई जगनाडे, मा. नगरसेवक   सचिन टकले यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत . वर्षाराणी गुंड यांनी व आभारप्रदर्शन. रतन दळवी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!