आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन : उदय सामंत.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटना यांचा संयुक्त मेळावा भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक येथे भोर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स अभय भोर संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला.

Spread the love

 औद्योगिक : लघुउद्योजकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन : उदय सामंत.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी ११ जानेवारी.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटना यांचा संयुक्त मेळावा भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक येथे भोर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स अभय भोर संपर्क कार्यालय येथे संपन्न झाला. या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत संघटनेच्या महिला अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केले एमआयडीसी विभागाचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, कलकुटकी कार्यकारणी अभियंता स्थापत्य विभाग पुणे, उपस्थित होते.

 

तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग सहसंचालक पुणे विभाग सदाशिव सुरवसे, प्रकाश रेंदाळकर महाव्यवस्थापक रेनदलकर, संजय चोरडिया, भोसरी स्पाइन पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब वाहतूक विभागाचे साळुंखे साहेब उपस्थित होते. मेळाव्यास बहुसंख्येने उद्योजिका आणि उद्योजक उपस्थित होते. या मेळाव्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

तसेच उद्योग मंत्र्यांना संघटने तर्फे चरखा भेट देण्यात आला. याप्रसंगी बोलताना उदय सामंत यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना शासनाच्या अनेक योजना बँकेचे अर्थसहाय्य तसेच महिलांनी उद्योगात पुढे प्रगती करण्यासाठी सातत्य राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. आणि संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शासनाच्या उद्योगासंदर्भात सर्व शासकीय योजना संस्थांनी पुढाकार घेऊन राबवाव्यात नवीन उत्पादने निर्मिती करावी. त्यासाठी आमच्याकडून सर्व मदत व शासकिय अधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा असे सांगितले आणि कायम सरकारचे सहकार्य उद्योजिका आणि उद्योजकांना असेच मिळेल या ठिकाणी अनेक मोठ्या कंपन्यांची उदाहरणे देत अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये अनेक महिला कर्मचारी जबाबदारीची भूमिका पार पाडत असतात तसे कौतुक केले. याप्रसंगी फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी एमआयडीसी परिसरात येणाऱ्या समस्यांविषयक माहिती दिली आणि उद्योजकांना पुढील काळामध्ये सहकार्याची भूमिका देऊन सरकारने एमआयडीसी उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत उद्योजकांना आज खरोखरच आनंद झाला. उद्योग मंत्र्यांनी एमआयडीसी परिसरात येऊन कंपन्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आणि पूर्ण सहकार्य करणार असल्याची घोषणा केली.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी एमआयडीसी परिसरात उद्योग मैत्रीण हे कार्यालय लवकरच संघटनेच्या माध्यमातून चालू करत असून याद्वारे शहरातील अनेक महिलांना उद्योगात कौशल्य विकास ट्रेनिंग देऊन महिला उद्योग उभारणीसाठी संघटना पूर्णपणे महिलांच्या पाठीशी उभी राहणार असून एमआयडीसी परिसरात महिला लघु उद्योजक संघटनेला महिलांसाठी कार्यालय तसेच महिलांसाठी पाळणाघर आणि स्किल डेव्हलपमेंट साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याप्रसंगी अनेक महिला उद्योजिका, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित असून सर्व शासनाचे अधिकारी वर्ग पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!