आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

अजितदादांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश.

प्रवेशामुळे रावेत- किवळे भागात भाजपची ताकद वाढली आहे.या भागातून भाजपला मताधिक्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Spread the love

अजितदादांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा भाजपमध्ये प्रवेश.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १६ फेब्रुवारी.

शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. तसेच ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातूनही इच्छुक होते. त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत असल्याने त्यांनी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ  यांनी आज  पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ओव्हाळ यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर  २०१९ लाभ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पोटनिवडणुकीच्या तोंडावर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेखर ओव्हाळ यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.त्यांच्या या प्रवेशामुळे रावेत- किवळे भागात भाजपची ताकद वाढली आहे.या भागातून भाजपला मताधिक्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!