आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डोंगरवाडी येथे आरोग्य तपासणी व मधुमक्षिका पालन, संकलन व संवर्धन याविषयावर शिबीर संपन्न.

दिनांक 16/02/2023 रोजी नूतन महाराष्ट्र इंजीनिअरिंग कॉलेज व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने वडेश्वर - डोंगरवाडी येथे कार्यक्रम पार पडला..

Spread the love

डोंगरवाडी येथे आरोग्य तपासणी व मधुमक्षिका पालन, संकलन व संवर्धन याविषयावर शिबीर संपन्न.

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, १६ फेब्रुवारी.

दिनांक 16/02/2023 रोजी नूतन महाराष्ट्र इंजीनिअरिंग कॉलेज व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने वडेश्वर – डोंगरवाडी येथे आरोग्य तपासणी व
मधुमक्षिका पालन, संकलन व संवर्धन याविषयावर शिबीर आयोजित केले होते.

जीवन पाटील सरांनी कार्यक्रमास सुरुवात केली. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळातर्फे श्री.संजय पाटील व श्रीरंग पीचट आले होते.संजय पाटील यांनी N.S. S च्या विद्यार्थ्यांना मधुमक्षीका पालन, मधमाशांचे अद्भूत विश्व या विषयी एक तास उत्तम मार्गदर्शन केले.

तसेच A.V.N pharma तर्फे  सचिन पाफाळे व सचिन बनसोडे यांनी ७५ जणांची Haemmogram तपासणी केली.तसेच A.V.N Pharma तर्फे रक्तवाढ होण्यासाठी मोफत औषधे देण्यात आली. केरळीय आयुर्वेदतर्फे Myaxyl ह्या औषधी तेलाच्या बाटल्या मोफत देण्यात आल्या.रुग्ण तपासणी व सल्ला देण्यासाठी डॉ. लता पुणे, डॉ. अपूर्वा मुंडर्गी यांनी सहकार्य केले.

या प्रकल्पासाठी रो. डॉक्टर सूर्यकांत पुणे, रो. तुषार पाटील,रो.मथुरे,रो. ज्योती नागराज मुंडर्गी यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!