आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

महाशिवराञीनिमित्त लोणावळा , औंढेखुर्द , कुरवंडे नागफणी येथे गर्दीचा उच्चांक.

नांगरगाव , वलवण , भैरवनाथनगर येथेही भाविकभक्तांची गर्दी .

Spread the love

महाशिवराञीनिमित्त लोणावळा , औंढेखुर्द , कुरवंडे नागफणी येथे गर्दीचा उच्चांक. नांगरगाव , वलवण , भैरवनाथनगर येथेही भाविकभक्तांची गर्दी .

आवाज न्यूज : लोणावळा ता.१८(प्रतिनिधी ).

महाशिवराञीनिमित्त लोणावळा , औंढेखुर्द , कुरवंडे , नांगरगाव , वलवण , भैरवनाथनगर येथे भाविकभक्ताँची दर्शनासाठी गर्दी उसळली होती.लोणावळा येथील श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात सुमारे दीड ते पावणेदोन लाख शीवभक्तांनी , महिला , व आबालवृध्द यांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

पहाटे चार वाजता श्री सिध्देश्वर महादेव मंदिरात विश्वस्थ यांचे हस्ते पूजा , अभिषेक संपन्न झाल्यानंतर भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.आदल्या दिवशीच दुकानदारांना दुकानाची साईजप्रमाणे आखणी करून दिल्यामुळे दुकानदारांनी रस्ता सोडून दुतर्फा विविध प्रसाद , खाद्यपदार्थ , खेळणी , महिला व मुलांंच्या , मुलींच्या वस्तू तसेच खेळणीवाले यांनी शीतपेयांवाले यांनी गर्दी होणार नाही , रस्ता सोडून दुकाने लावली होती.

लोणावळा शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गृहरक्षकदलाचे जवान व महिला पोलिस यांची ठिकठिकाणी नेमणूक केल्याने गर्दीवार नियंत्रण ठेवता आले.तसेच भाविकांकडून रांगा लावून दर्शन घेण्यात आले.
सायंकाळी दहा वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन मंदिरात पूजा व आरती होऊन पुन्हा दर्शनास मंदिर खुले करण्यात आले.

श्री.सिध्देश्वर देवस्थान , रायवूड , लोणावळा चे अध्यक्ष जगदिश रे.निंबाणे , उपाध्यक्ष धिरजलाल टेलर ( कल्याणजी ), खजिनदार गणेश दत्ताञेय गवळी , (लंगोटे), सदस्य रामलिंग ब. संगोळी , गामाण्णा म.कुंभार ,  संतोष मो.चोरडीया असे स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे विश्वस्थ यांनी योग्य नीयोजन केले होते. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई केली होती.परिसरात बसलेल्या दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेल्या मालाची लाखोंची उलाढाल झाली.
.
औंढेखुर्द येथे श्री नागनाथ महादेवमंदिरात लोणावळा व पंचक्रोशितील भाविकांकडून दर्शनास रांगा..
औंढेखुर्द येथील प्रसिध्द असलेल्या श्री नागनाथ महादेव मँदिरात औंढेखुर्द , औंढोली , तसेच परिसरातून आलेल्या भाविकांकडून हार , फुले , आगरबत्ती , प्रसाद घेवून भाविक महिला यांची गर्दी झाली.येथे पहाटेपासूनच आनेकांनी दुग्धाभिषेक केले.येथील श्री नागनाथ महादेवाची प्रसन्न मुर्ती पाहण्यासाठी व दर्शनास लांबलांबून ग्रामस्थ येत होते. येथे औंढे विकास सोसायटी चे माजी चेअरमन सुरेशभाऊ आबाजी आंबेकर यांचेकडून उपवासाची चिक्की , फराळ वाटप करण्यात आला.

औंढेखुर्द येथील श्री नागनाथ महादेव याञा उत्सवानिमित्त ता.१९ रोजी भव्य बैलगाडा शर्यती व राञी फलटण येथील तमाशा पथकाचे वगनाट्य होणार असून ता.२० रोजी दुपारी नामवंत मल्लाँचा कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.असे ग्रामस्थांचे वतीने जाहीर पञकात प्रसिद्धीस दिले आहे.
औंढोली येथेही श्री शिव मंदिरात भाविकांकडून अभिषेक व दर्शनास गर्दी झालेली पहायला मिळाली.
कुरवंडे येथील नागफणी येथे काल मध्यरात्री पासूनच गावातील व बाहेरगाच्या भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी झाली होती.

नांगरगाव मार्गावरील श्री सोमनाथ महादेव मंदिरातही भाविकांकडून दर्शनास गर्दी झाली होती.वलवण येथे श्री महादेव म़दिरात तसेच तुंगार्ली , खंडाळा येथील शिव मंदिरातून भाविकांकडून दर्शनास रांगा लावल्या होत्या.
भैरवनाथनगर येथील श्री भैरवेश्वर महादेव मंदिरात भाविकांकडून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या .येथे सुंदर विद्युतरोषणाई केलेली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!