आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

महाशिवराञीनिमित्त घोरावडेश्वर मंदिरात काल पासुनच गर्दीचा महापुर.

हर हर महादेवच्या जयघोषात लाखो भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.

Spread the love

महाशिवराञीनिमित्त घोरावडेश्वर मंदिरात काल पासुनच गर्दीचा महापुर.

 

हर हर महादेवच्या जयघोषात लाखो भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १८ फेब्रुवारी.

मावळ तालुक्यातील जागृत देवस्थान श्री.घोरावडेश्वर महादेव मंदिर येथे भाविकभक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती.महादेव मंदिरात  लाखो भाविक, महिला , व आबालवृध्द यांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.पहाटे तीन वाजता श्री घोरावडेश्वर महादेव मंदिरात  पूजा , अभिषेक संपन्न झाल्यानंतर भाविकांकडून दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.डोंगर चढून भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

अभिषेक व  पुजेसाठी, पुणे जिल्ह्यातील मान्यवरांनी, घोरावडेश्वर महादेव मंदिरात लावली हजेरी.

 

डोंगर माथ्यावरुन खाली सेंट्रल पर्यंत नागरिकांच्या सेवेसाठी, पाणी, खिचडी, सरबत,केळी प्रसादाचे वाटप केले जात होते.दुकानदारांना दुकानाची आखणी करून दिल्यामुळे दुकानदारांनी रस्ता सोडून दुतर्फा विविध प्रसाद , खाद्यपदार्थ , खेळणी , महिला व मुलांंच्या , मुलींच्या वस्तू तसेच खेळणीवाले यांनी  गर्दी होणार नाही , रस्ता सोडून दुकाने लावली होती.

तळेगाव शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गृहरक्षकदलाचे जवान व महिला पोलिस यांची ठिकठिकाणी नेमणूक केल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवता आले.तसेच भाविकांकडून रांगा लावून दर्शन घेण्यात आले.
तसेच परिसरातून आलेल्या भाविकांकडून हार , फुले , आगरबत्ती , प्रसाद घेवून भाविक महिला यांची गर्दी झाली.

भजन, कीर्तनाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

श्री क्षेत्र घोरावडी विकास प्रतिष्ठान तर्फे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!