आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात”मितेश हुलावळे”आदर्श युवक पुरस्काराने सन्मानित.

कार्ला येथील शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने कार्ला गावठाणातील शिवशंकर मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात”मितेश हुलावळे”आदर्श युवक पुरस्काराने सन्मानित.

आवाज न्यूज : कार्ला मावळ प्रतिनिधी, १९ फेब्रुवारी.

कार्ला येथील “मितेश हुलावळे”या तरुणास आदर्श युवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाशिवरात्रीनिमित्त कार्ला येथील शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने कार्ला गावठाणातील शिवशंकर मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी मंडळाचे सदस्य कुमार हुलावळे सपत्नीक रूद्राअभिषेक करण्यात आला.सकाळ पासुन भाविकांना कार्ला ग्रांमस्थ काशिनाथ फाटक ,रविंद्र हुलावळे,सुधाकर कचरे, व शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.संजय ओझा यांनी पाणी बाॅटल दिल्या. सायंकाळी कार्ला येथील श्री एकविरा माध्यमिक विद्यालय व लाजवंती हंसराज गुप्ता कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंताचा व शिक्षकांचा सन्मान व गावातील दिव्यांग बंधुना दिव्यांगाचे दाखले वाटप करण्यात आले.

कै गणेश विश्वनाथ हुलावळे यांच्या स्मरणार्थ गेल्या तीन वर्षांपासून देण्यात येत असलेल्या कार्ला गाव मर्यादीत आदर्श युवक पुरस्कार “मितेश नागेश हुलावळे”या तरुणास उपस्थित मान्यवर भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक सुभेदार कैलास येवले,नियोजन समिती सदस्य शरदराव हुलावळे,ह भ प अनंता महाराज शिंदे,यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जेष्ठ नागरिक सदाशिव हुलावळे,ह भ प शंकरराव हुलावळे,तुकाराम हुलावळे,रमेश जाधव,पांडुरंग हुलावळे,अनिल हुलावळे,विष्णु हुलावळे ,विनोद नामदेव हुलावळे,अमोल कदम,बाळु रघुनाथ हुलावळे,पत्रकार संजय हुलावळे,ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,सदस्या वत्सला हुलावळे,मंडळाचे उपाध्यक्ष राजु हुलावळे,माजी अध्यक्ष दिलीप हुलावळे,माजी अध्यक्ष कैलास कुंडलिक हुलावळे,रोहीदास शिर्के,संजय हुलावळे,कुमार हुलावळे,विनोद बाळु हुलावळे,मंगेश हुलावळे,गणेश हनुमंत हुलावळे,मितेश हुलावळे,विशाल भाऊसाहेब हुलावळे,अनिल चंद्रकांत हुलावळे,यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारकांना सन्मानित व दिव्यांग बंधुना दाखले देण्यात आले.

यावेळी कार्ला ग्रांमस्थ,सन्मानितांचे पालक,विधार्थी उपस्थित होते.मंडळाचे सल्लागार भाऊसाहेब हुलावळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर कुमार हुलावळे यांनी आभार मानले.रात्री विठ्ठल रुख्मिणी भजनी मंडळ कार्ला यांच्या वतीने हरीजागर करण्यात आला.कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन शिवशंकर तरूण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!