ताज्या घडामोडी

मा.आ. नरेंद्र घुले पाटील यांनी कंपोष्ट खत निर्मिती प्रकल्पाचे विभाग प्रमुख श्री.विष्णू पा. सावंत यांचा केला सन्मान

Spread the love

२०२१-२२ या गळीत हंगामात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा.का. चे चेअरमन मा.आ. नरेंद्र घुले पाटील यांनी कंपोष्ट खत निर्मिती प्रकल्पाचे विभाग प्रमुख श्री.विष्णू पा. सावंत यांचा सन्मान केला. त्यांचे
हार्दिक अभिनंदन !
श्री विष्णू पांडुरंग सावंत. बीएससी हॉर्टिकल्चर चे शिक्षण करून सन 1992 पासून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा येथे शेतकी विभागात कार्यरत असून 1992 ते 2010 पर्यंत कृषी विभाग व फळबाग गार्डन सुपरवायझर या पदावर कार्य केले सन 2011 पासून ज्ञानेश्वर कारखान्याचे बायो कार्पोरेट विभाग येथे बायो कार्पोरेटर चार्ज म्हणून काम पाहताहेत सुरुवातीपासून कंपोस्ट बद्दल शेतकऱ्यां मध्ये आत्मविश्वास निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन शेती विषयक व खत विषयक निर्मिती व विक्री याचे मार्गदर्शन केले बायो कंपोस्ट खताचे वापर व फायदे समजावून सांगत असतात त्यासाठी त्यांनी कारखान्यातील वायू कंपोस्ट विभागांमध्ये उत्तम प्रकारचे खत निर्मिती केली व त्याचं विक्रमी विक्री करून कारखान्याला सुंदर असा मोबदला मिळवून दिला त्यात शेतकऱ्याचे त्यांनी मन जिंकले व याच कार्यामुळे संपूर्ण ज्ञानेश्वर सहकारी कारखाना परिसरातील शेतकरी वर्षातून अनेक वेळा वेगवेगळी खते विकत घेत होती त्याऐवजी ते आता कंपोस्ट खत वर्षातून एकदाच वापरू लागलेली आहेत याचं श्रेय माननीय श्री सावंत साहेबांना जाते ते ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ मुख्य शेतकी अधिकारी व तसेच सहकारी व इतर मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली सतत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या फायद्याचे कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याची संपूर्ण कारखाना परिसर व इतर ठिकाणी नेवासा तालुका विभागात सुद्धा कौतुक केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!