अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

पापाचे विसर्जन व पुण्याचा उदय म्हणजे सामायिक. प.पु.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज.

Spread the love

पापाचे विसर्जन व पुण्याचा उदय म्हणजे सामायिक.
प.पु.मु.श्री.पियुषचंद्र विजयजी महाराज.The dissolution of sin and the rise of Puny are shared.P.P.M.Shri.Piyushchandra Vijayji Maharaj.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ जुलै.

परमपथ अध्यात्मिक चातुर्मास २०२३ – श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर,तळेगाव दाभाडे
पापाचे विसर्जन करने व पुण्याचा उदय करण्याचा मार्ग ४८ मिनटाच्या सामाइक मधून जातो.पापाच्या उदयापासून अनेक जीवांना हानी पोहोचते व पुण्यापासून अनेक जीवांना सुख व शांती मिळते सामायिक करणाऱ्याला शांती मिळते व त्याचा परिवार सुद्धा सुख व शांतीमध्ये राहतो.

मनुष्याने आपल्या जीवनामध्ये एक मार्ग निवडावा व मनामध्ये धर्माचा समावेश करावा किंवा धर्मामध्ये मनाची स्थिरता ठेवावी तेव्हाच इतर सर्व वन्यजीव प्राणी सुखी होऊ शकतात.यामुळेच स्वतःशी बोलणारा स्वतःच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊ शकतो. प्रभावना या शब्दाचा अर्थ सांगताना मुनी श्री पियुषचंद्र विजय जी महाराज  म्हणाले धर्माप्रती आदरभाव ठेवणे यालाच प्रभावना म्हणतात.

तळेगाव दाभाडे येथील जिरावाला जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज साहेबांचे यांचे अज्ञानु वरती शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी मुनीराज श्री पियुषचंद्र विजयजी महाराज, मुनिराज श्री रजतचंद्र विजयजी महाराज, मुनी  प्रितेशचंद्र विजयजी महाराज यांचा परमपथ चातुर्मास २०२३ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

शुक्रवार दिनांक १४ जुलैपासून ३ दिवसीय सामूहिक अट्टम तप ( तीन दिवसीय निरंकार उपवास ) मोठ्या उत्साहाने सुरू होणार आहे. ४४ दिवसाची सिध्दीतप चे उपवास खूप धूम धाम मध्ये चालू झाले आहेत या मध्ये ३६ दिवस निरंकार उपवास व ८ दिवस बियाशना असा हा तप चालू झालेला आहे.रोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत चातुर्मासा निमित्त प्रवचन श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!