आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा..

कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.

Spread the love

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा..Marathi language day celebrated in Swami Vivekananda English School.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर २७ फेब्रुवारी.

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.

सदर कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका. शमशाद शेख मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापिका सौ शमशाद शेख मॅडम पर्यवेक्षिका. रेणू शर्मा मॅडम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमांमध्ये शाळेच्या शिक्षिका. आयेशा मिन्ने मॅडम यांनी भाषण केले. मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी मराठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषेचे महत्व त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. इयत्ता आठवीतील सुरक्षा कटारे या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले तसेच इयत्ता पाचवी मधील शर्वरी अर्जुन पवार या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला.

शाळेच्या मुख्याध्यापिका. शमशाद शेख मॅडम यांनी कविता तालासुरात कशी म्हणावी मराठी उच्चार कसे करावे अवांतर वाचन व निबंध लेखनाने स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करावे. असे मार्गदर्शनात्मक भाषण त्यांनी केले.कार्यक्रमांमध्ये मराठी भाषा या दिनानिमित्त मराठी भाषेचे महत्व यावर निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा कथाकथन स्पर्धा प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन शालेय मुख्याध्यापिका. शमशाद शेख मॅडम पर्यवेक्षिका मॅडम सर्व शिक्षक वृंद व शालेय कर्मचारी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका, प्रतिभा शिरसाट यांनी केले.

 

या कार्यक्रमाचे श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष.संतोष खांडगे, सचिव मिलिंद शेलार व शालेय समिती अध्यक्षा. रजनीगंधा खांडगे यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!