आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनदेश विदेशमहाराष्ट्र

चिक्की दुकाने किती आणि फ्रँन्चायजी किती याची चौकशी ईडी ने करण्याची गरज;

पञकार बातम्या देतात , त्यामुळे पर्यटकांवर परिणाम होत असल्याचा मगनलाल चिक्की चे मालकाकडून आरोप..!

Spread the love

चिक्की दुकाने किती आणि फ्रँन्चायजी किती याची चौकशी ईडी ने करण्याची गरज; पञकार बातम्या देतात , त्यामुळे पर्यटकांवर परिणाम होत असल्याचा मगनलाल चिक्की चे मालकाकडून आरोप..!ED needs to investigate how many small shops and how many franchises; The owner of Maganlal Chikki alleges that punkars give news, thus affecting the tourists..!

आवाज न्यूज ‌‌: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा, प्रतिनिधी २७ फेब्रुवारी.

चिक्की दुकाने किती आणि फ्रँन्चायजी किती याची चौकशी ईडी ने करण्याची गरज; पञकार बातम्या देतात , त्यामुळे पर्यटकांवर परिणाम होत असल्याचा मगनलाल चिक्की चे मालकाकडून आरोप करण्यात आला आहे.लोणावळा शहरात किती मूळ दुकाने आणि किती फ्रँन्चायजी पाट्या असलेली दुकाने आहेत, याचा तपास ईडी च्या यंञणांनी करण्याची गरज आहे.

वार्ताहर , पञकार बातम्या देतात. थोडी वाहतूक कोंडी झाली , की लगेच पञकार बातम्या देतात , वृत्त प्रसारीत करतात , त्यामुळे चिक्की चे व्यवसायवर परिणाम झाला असून व्यवसायात अत्यंत नुकसान होत असल्याने जा

 

 

हिराती देणे परवडत नाही. दिवाळीला दिलेल्या साप्ताहिकातील जाहिराती चे पेमेंट तसेच काही देणी देता आली नाही , त्यामुळे मगनलाल चिक्की आर्थिक संकटात असल्याचे मगनलाल चिक्की चे डायरेक्टर मंगेश धृव आगरवाल यांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

खरेच व्यवसायात तोटा होतो का , जर होत असेल , तर लोणावळा शहरात वाढलेल्या प्रचंड प्रमाणातील वाढलेल्या फ्रँन्चायजी दुकानांबाबत संशयास्पद स्थिती दिसून येते.
याबाबत मगनलाल चिक्की चे डायरेक्टर व माजी उपनगराध्यक्ष कै.धृव मोहनलाल आगरवाल व माजी नगरसेविका शशी धृव आगरवाल यांचे पुञ मंगेश धृव आगरवाल यांनी पञकारांचेवर निशाना साधत चिक्की व्यवसाय आर्थिक संकटात आहे , थोडीशी जरी ट्रॕफीक जाम झाली ? , तर पञकार लगेच फोटो काढून सोशलमिडीयावर व वृत्तपञात बातम्या देतात.त्यामुळे हा व्यवसाय आर्थिक दृष्टीने संकटात सापडला आहे.

 

याबाबत ई डी कार्यालयाने तसेच मुंबई दुकाने अधिनियम कायद्यानुसार शेकडो च्या घरात वाढलेल्या लोणावळ्याच्या शहर भागात दुकाने व फ्रँन्चायजी यांची तपासणी करणे काळाची गरज आहे.येथील कामगारांना पुरेशा सोयी सुविधा न देता , त्यांचेसाठी मशिनरीवर माल काढून तो घाऊक प्रमाणात दुकानदारांना पुरवणारे व्यवसायिक यांची सक्तवसुली संचालनालयाने तपासणी करून दूध का दूध पाणी का पाणी तपासण्याची गरज काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!