आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी,३१३१ डिस्ट्रिक्ट मेडिकल टीम व माऊली हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर संपन्न..

या शिबिराचा १२६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला..

Spread the love

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी, २४ नोव्हेंबर.

  रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी,३१३१ डिस्ट्रिक्ट मेडिकल टीम व माऊली हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर शनिवार दिनांक 19 11 2022 रोजी माऊली हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी शांताई सिटी तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विन्सेंट सालेर हे होते.
कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉक्टर युवराज बढे यांनी मधुमेह या विषयावरती सर्वांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी चे अध्यक्ष विन्सेंट सालेर यापुढेही आम्ही असे कार्यक्रम घेत जाऊ असे सांगितले.आपण आपल्या तब्येतीची  काळजी घ्यावी जास्त त्रास हे आपल्या मानसिक तणावामळे उद्ध्भवत असतात असे सांगितले.यावेळी माऊली हॉस्पिटल तर्फे सर्व शिबिरार्थींचे मधुमेह तपासणी सोबतच ECG तपासणी देखील करण्यात आली .

या शिबिराचा १२६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो. अनिल धर्माधिकारी यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे रो. सुनील खोलम यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी चे रो. रूथ सालेर,रो सुवर्णा मते,रो सुषमा गराडे,रो.हिरामण बोत्रे ,रो विलास टकले,रो.संदीप मगर,रो निलेश रहाते,रो. दशरथ जांभूळकर.रो योगेश शिंदे , तसेच माऊली हॉस्पिटल चा संपूर्ण स्टाफ . उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!