आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

माजी प्रांतपाल सन्मान व लायन्स क्लबच्या नवोदित लायन सभासदांचे प्रशिक्षण संपन्न!–

अमेरिकेतील शिकागो येथे इसवीसन १९१७ यावर्षी स्थापन झालेल्या लायन्स संघटनेच्या स्थापने पासूनच्या विस्ताराचा संपूर्ण आलेख उपस्थितांसमोर सादर...

Spread the love

माजी प्रांतपाल सन्मान व लायन्स क्लबच्या नवोदित लायन सभासदांचे प्रशिक्षण संपन्न!–Ex-provincial honors and training of new Lion members of Lions Club completed!–

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. ७ मार्च.

लायन अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी उपस्थितांच स्वागत केल्यानंतर सेक्रेटरी लायन राजेंद्र झोरे ट्रेझरर लायन सचिन शहा यांनी आपापले रिपोर्ट सादर केले! उच्च विद्याविभूषित डॉक्टर अनिश भट व डॉक्टर सचिन विटनोर या उभयतांचं लायन परिवारात नव्यानेच प्रवेश करणाऱ्या डॉक्टरांच सहर्ष स्वागत करण्यात आले.

 

आंतरराष्ट्रीय लायन संघटने विषयी “ज्येष्ठ लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी” यांनी; अमेरिकेतील शिकागो येथे इसवीसन १९१७ यावर्षी स्थापन झालेल्या लायन्स संघटनेच्या स्थापने पासूनच्या विस्ताराचा संपूर्ण आलेख उपस्थितांसमोर सादर केला! जगातील २११ राष्ट्रात जवळजवळ ४७ हजार क्लबच्या माध्यमातून १५ लाख सभासद आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत!

औद्योगिक- शैक्षणिक शारीरिक मानसिक- आरोग्य संवर्धक आणि स्वयंरोजगारातून आर्थिक सहाय्य अशा मानवी जीवनाच्या विविध विभागांचा यात समावेश आहे! लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना- आज ही जगातील सर्वात मोठी असलेली सामाजिक संस्था आहे! या संघटनेच्या सभासदाला त्याच्या अधिकाराबरोबरच त्यांच्या कर्तव्याची जाणीव लायन डॉक्टर भंडारी यांनी पुढे आपल्या मनोगतात स्पष्ट केली! त्याबरोबरच आपण टाईम-टॅलेंट ट्रेझर म्हणजेच– आपला वेळ -आपले बुद्धी कौशल्य व शक्य तिथे आर्थिक सहाय्य या संस्थेच्या माध्यमातून समाजाला देणे हेही सभासदांकडून अपेक्षित आहे! हे ही डॉक्टरांनी पुढे स्पष्ट केले.

 

यानंतर माजी प्रांतपाल सन्मान महिन्याच्या निमित्ताने- माजी प्रांतपाल लायन दीपकभाई शहा व प्रतिभाभाभी या उभयंतांचा क्लब तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला! महिला दिनानिमित्त उपस्थित लायन भगिनींचाही गौरव करण्यात आला! लायन भरत पोद्दार यांच्या आभार प्रदर्शनानंतर सुग्रास भोजनाने या समारंभाची सांगता झाली!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!