आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त वाकसई फाटा येथे संत तुकाराम महाराज झाडाजवळ सप्ताहाचे आयोजन.

महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने ऐकायला मिळणार आहे.

Spread the love

संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त वाकसई फाटा येथे संत तुकाराम महाराज झाडाजवळ सप्ताहाचे आयोजन Week organized near Sant Tukaram Maharaj tree at Vakasai Phata on the occasion of Sant Tukaram Maharaj Bije. 

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा  प्रतिनिधी ७ मार्च.

संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त वाकसईफाटा येथे संत तुकाराम महाराजझाडाजवळ ता.३ ते ता.१० सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तने ऐकायला मिळणार आहे. मावळातील फक्त नवोदित प्रवचनकार यांची प्रवचने होणार आहेत. मावळातील एकही कीर्तनकार यांची कीर्तनसेवा नाही.

रोज पहाटे ४ ते ६ काकडाआरती , सकाळी ८ते ११ गाथा पारायण , दुपारी १२ते १ गाथा भजन , सायंकाळी ४ते ६ हरिपाठ , सायंकाळी ६ते ७ प्रवचन , राञी ९ ते ११ हरिकीर्तन होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्टतर्फे वाकसई फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सप्ताहाचे हे २७ वे वर्ष आहे.
ता.३ रोजी ह.भ.प.काळुराम महाराज देशमुख (देवघर ) यांचे प्रवचन व राञी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज फालके (आळंदी ) यांचे कीर्तन झाले.

ता.४ रोजी ह.भ.प.जयवंत महाराज ढाकोळ (सदापूर ) यांचे प्रवचन झाले.राञी ह.भ.प.जयेश महाराज भाग्यवंत (डोँबिवली ) यांचे कीर्तन झाले.
ता.५ रोजी ह.भ.प.मोनिकाताई भांगरे (निगडे ) यांचे कीर्तन झाले. राञी ज्ञानेश्वर महाराज जवळेकर (बुलढाणा ) यांचे कीर्तन झाले.ह.भ.प.कु.मोनिकाताई भांगरे प्रवचनात म्हणाल्या ,” मनुष्याला आनेक पाश आहेत.आशा आहेत.पाश नको आसल्यास आत्मचिँतन करा.परमार्थ का करायचा .नामचिँतन का करायचे ? चित्त अस्थीर झाले आहे , ते स्थीर करण्यासाठी परमार्थ करायचा आहे.माणसाच्या पैसे कसे येतील एवढेच डोक्यात आहे.देव स्वरूप होण्यासाठी देवाचे प्राप्तीसाठी प्रथम गुरू करावा. गुरू केल्यास ज्ञान प्राप्त होईल.त्यासाठी संतांची भेट होणे अवश्यक आहे.

बहु आवघड आहे संतभेटी परि जगजेठी करूणा केली!!.संतांची भेट झाली की षड्विकार जुळून जातील , हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय ! ! मग देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ करायचाय तर गुरू करा. कारण गुरू तेथे ज्ञान ! ! ज्ञानी आत्मदर्शन ! ! दर्शनी समाधान ! ! आर्ती जैसे ! ! अशा प्रकारे संत सज्जन ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथ गुरू भेटल्याने उध्दार झाला असे अभंगात म्हटले आहे. संत जनाबाई यांचेबरोबर साक्षात पांडुरंग जात्यावर दळण दृळीत असे ! ! एके दिवशी दळतादळता झोप लागली.पहाटेची काकडाआरती ची वेळ झाली. देव आहे तसेच मंदिरात गेले. शेला , सोन्याचे अलंकार जनाबाई चे घरी विसरले..तिच्यावर चोरीचा आळ आला..बादशहाने तिला सुळावर चढविण्याची शिक्षा फर्मावली.पण सुळाकडे जाताना त्याचे पाणी पाणी झाले , इतकी ताकद जनाबाई चे निष्काम भक्तीत होती..

यावेळी त्यांचा मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्हे देवून सत्कार करण्यात आला. सूञसंचालन आमोल केदारी यांनी केले.ता.६ रोजी ह.भ.प.आंकुश महाराज वाघिरे (भाजे) ,यांचे प्रवचन झाले.राञी ह.भ.प.सोमनाथ महाराज कराळे ( पैठण) यांचे कीर्तन झाले.ता.७ ह.भ.प.ह.भ.प.दिलीप महाराज खेंगरे (भाजे) यांचे प्रवचन व राञी ह.भ.प.विजय महाराज आडदळ (गेवराई ) यांचे कीर्तन होईल.
ता.८ रोजी ह.भ.प.लक्ष्मण महाराज इंगूळकर (वाकसईचाळ ) यांचे प्रवचन व राञी हा.भ.प.केशव महाराज मुळीक (इंदापूर ) यांचे कीर्तन होईल. ता.९ रोजी ह.भ.प.भिमाजी महाराज भानुसघरे (शिलाटणे ) यांचे प्रवचन होईल व दुपारी १० ते १२ बीज सोहळा ,संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त ह.भ.प..प्रकाश महाराज उगले (परभणी ) यांचे कीर्तन होईल.त्यानंतर महाप्रसाद होईल. राञी ह.भ.प. कृष्णा महाराज कमाणकर (नाशिक ) यांचे कीर्तन होईल.
ता.१० रोजी ह.भ.प.दिपक महाराज बादाडे (बीड ) यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!