आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे येथे महिला दिन उत्साहात साजरा..

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले..

Spread the love

नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे येथे महिला दिन उत्साहात साजरा..New Samarth Vidyalaya Talegaon Dabhade celebrated Women’s Day with enthusiasm.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,८ मार्च.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील सर्व अध्यापिका कार्यालयीन कर्मचारी महिला वर्ग यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे प्राचार्य, संजय भाऊसाहेब वंजारे व पर्यवेक्षक, रेवाप्पा शितोळे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले विद्यालयातील अध्यापक. योगेश पाटील  युवराज रोंगटे, अरविंद नाईकरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सर्व महिलांचे स्वागत गीताच्या तालासुरात करण्यात आले मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक. शितोळे यांनी केले. सर्व महिला अध्यापिकांना पेन व पुष्प देऊन आदर सत्कार करण्यात आला .महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील महिलांचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

विद्यालयातील जेष्ठ अध्यापिका वासंती काळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संजय वंजारे यांनी अध्यक्ष मनोगतातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद नाईकरे यांनी केले शिक्षक प्रतिनिधी सौ शारदा वाघमारे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!