आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित फाऊंडेशन मध्ये मुलांनी उभारली ज्ञानाची गुढी..

ज्ञानपाप्तीचे साधनं पुस्तकं असतात. म्हणून फाऊंडेशन मध्ये ६-७ वर्षांपासून ज्ञानाची गुढी उभारण्याची परंपरा आहे.

Spread the love

अजित फाऊंडेशन मध्ये मुलांनी उभारली ज्ञानाची गुढी !In Ajit Foundation, the children set up a treasure of knowledge!

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २२ मार्च.

 

गुढी पाडव्याला घरोघरी दर वर्षी पारंपारिक गुढी उभारून मराठी वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा राज्यात मोठ्या उत्साहात गुढी पाडव्याचा सण साजरा होत आहे. संकटं नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मीत असोत, त्याला एकजुटीने लढा देण्याची मानवी वृत्ती असते. जेव्हा अशा लढ्यास संशोधनाची जोड मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने ती विजयाची गुढी ठरते. याचे कोरोना महामारी उदाहरण आहेच. मात्र ही विजयाची ज्ञानाच्या गुढीवर आधारलेली..! ज्ञानामुळे माणूस अन् समाज समृद्ध होतो. ज्ञानपाप्तीचे साधनं पुस्तकं असतात. म्हणून फाऊंडेशन मध्ये ६-७ वर्षांपासून ज्ञानाची गुढी उभारण्याची परंपरा आहे. कोविड काळात दोन वर्षे आरोग्याची गुढी उभारली होती.

अजित फाऊंडेशन मधील मुले पाडव्याच्या पूर्वसंध्येला ग्रंथालयातील पुस्तकं, विविध मासिकं, अभ्यासक्रमची पुस्तकं, ग्रंथ, संविधान एकत्र करून जुळवा जुळव करतात. जेव्हा मुलं पुस्तकाची रचना करतात तेव्हा, एक एक पुस्तक हाताळतात. तेव्हा मुक्त चर्चा सुरु होते, ” हे चित्र किती भारीय न ?’ यातल्या गोष्टी मी वाचल्या आहेत. अर्रर्र, हे पुस्तक मला मिळालेच नाही. ” यातून किमान मुलांना आपल्याकडे कोणती, पुस्तकं आहेत, कोणती वाचलीत कोणती नाही? याची माहिती होते. त्यामुळे ही पुस्तकांची गुढी मुलांसाठी नवी कवाडं उघडी करतात. थोडक्यात ही संकल्पना मुलांना वाचनप्रेमी बनवते त्यासाठी मदत केली.

अशी उभारली ज्ञानाची गुढी

छोट्या सेजलपासून विनायक पर्यत सर्वानी पुस्तके रचन्यास पुढाकार घेतला. बघता, बघता २७० पुस्तकांची ही गुढी उभारली. आता या गुढीला फेटा बांधावा, हा विचार महावीर ने बोलून दाखवला, त्यानुसार पुरस्काराला मिळालेला फेटा या ज्ञानाच्या गुढीला घालण्यास दिला. त्यानुसार महावीर आणि शुभमची संकल्पना साकार झाली.

 

या गुढीत गोष्टींची पुस्तके, भारतीय संविधान, भगवत गीता, बखरी, तुकाराम गाथा, तोत्तोचान, लीलाताई पाटील यांचा पुस्तकांचा संग्रह, नीलची शाळा, जिथं मुलांना पंख फुटतात, तसेच नामवंत लेखकांची विविध पुस्तके व लहान मुलांच्या विविध कथांच्या पुस्तकांचा समावेश आहे. या संकल्पनेमुळे मुले पुस्तकं हाताळतात, वाचण्यास उद्युक्त होतात, शिवाय मुलांना ग्रंथालयातील पुस्तक संचाची नव्याने माहिती मिळाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!