आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

धर्मवीर बलिदान मास म्हणजे हिंदुंचे एक राष्ट्रीय सुतक..

फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्च,वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी,धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना  दररोज श्रद्धांजली अर्पण करतात.

Spread the love

बलिदान मास म्हणजे हिंदुंचे एक राष्ट्रीय सुतक..Sacrifice Mass is a national festival of Hindus.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी २२ मार्च.

या महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी,धारकरी,लहान मुले मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना  दररोज श्रद्धांजली अर्पित केली.

 

दिनांक८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले.
या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले.यामध्ये सातत्याने महिनाभर गावचे सुपुत्र शिवव्याख्याते हिंदुपुत्र दिगंबर पडवळ यांनी हिंदू धर्मावर जागृती केली तसेच या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करण्यात आले.

यामध्ये रविवार १२/०३/२०२३ ह.भ.प गणेश महाराज फाळके.
मंगळवार १४/०३/२०२३ ह.भ.प रोहिदास महाराज केदारी
गुरुवार १६/०३/२०२३ ह.भ.प गणेश महाराज जांभळे
शनिवार १८/०३/२०२३ ह.भ.प सुनील महाराज वरघडे
सोमवार २०/०३/२०२३ शिवव्याख्याते सतीश साठे
यांचे धर्मपर मार्गदर्शन झाले.

दिनांक २१/मार्च/२०२३ रोजी
महामृत्युंजय अमावस्या,या दिवशी दिगंबर पडवळ यांनी सांगितले की हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळण्यात यावा पुढे ते म्हणाले की,
फाल्गुन वद्य अमावस्या म्हणजे महामृत्युंजय अमावस्या, महातेजस्वी अमावस्या, महाशक्तीशाली अमावस्या. हो !!
हिंदू, हिंदुधर्म व हिंदुस्थान यांचे अंतर्बाह्य शत्रू समूळ नष्ट करण्याची ताकद, हिम्मत, चढाऊपणा, लढाऊपणा देणारी एकमेव अमावस्या म्हणजे धर्मवीर अमावस्या.
धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजांनी देवदेशधर्मासाठी धीरोदात्तपणे दिलेलं महातेजस्वी बलिदान ही एक प्रेरणा व ताकद आहे. इस्लाम व इतर म्लेंच्छाचा संहार करण्यासाठी ती ताकद हर एक हिंदूला मिळावी त्यासाठी एक महिना आपण “धर्मवीर बलिदान मास” पाळतो.

आज शंभूराजे देहाने जिवंत नाहीत. मनाने आहेत पण केवळ मोजक्या हिंदूंच्या चित्तात आहेत. हे लक्षात घेऊन,दिनांक २१/मार्च रोजी सकाळच्या प्रहराला आई एकविरा मंदिरात ज्योत प्रज्वलीत करून मोठ्या संख्येने मुकपदयात्रा काढून श्री शिवशंकर मंदिर वेहेरगाव येथे समाप्ती झाली.

सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यात ५५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
संध्याकाळी ८ ते ९ बालशिवव्याख्याती साक्षीताई ढगे यांचे व्याख्यान झाले.संध्याकाळी ९ ते १० शिवशाहीर शिवव्याख्याते दिगंबर पडवळ यांचे नरवीर तानाजी मालुसरे व धर्मवीर यांची शाहिरी सेवा संपन्न झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!