आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा शनिवारी गौरव समारंभ. संतोष खांडगे 

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

Spread the love

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा शनिवारी गौरव समारंभ..संतोष खांडगे On the occasion of International Women’s Day, women from various fields were felicitated on Saturday..Santosh Khandge

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, वार्ताहर. २२ मार्च.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी अप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.

हा सन्मान सोहळा येत्या २५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता तळेगाव दाभाडे येथील हॉटेल इशा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली.

 

राजमाता जिजाऊ समाजरत्न पुरस्कार सुनंदा काकडे यांना, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार शिल्पा रोडगे यांना, शांताई आदर्श माता पुरस्कार शकुंतला फलके यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यामध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी विजया इनामदार, कृषी क्षेत्रासाठी अनुपमा दाभाडे, साहित्यिक क्षेत्रासाठी मीनाक्षी भरड, सांस्कृतिक क्षेत्रासाठी रश्मी पांढरे, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. शैलजा पवार, सहकार क्षेत्रासाठी अरुणा ढाकोळ, उद्योग क्षेत्रासाठी मंगलाताई भोमे, सांप्रदायिक क्षेत्रासाठी पार्वतीबाई भेगडे यांना, तर उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून वीरांगना महिला विकास संस्थेला गौरविण्यात येणार आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष. बाळासाहेब काशीद असणार आहे. लेखक प्रा. नामदेवराव जाधव, सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त. किरण काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष. रामदास काकडे, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष. गणेश खांडगे उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!