आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

हिंदू समाजापासून संघाचे अस्तित्व वेगळे नाही. अभिजीत शिंदे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तळेगाव दाभाडे आयोजित ' वर्षप्रतीपदा उत्सव ' कार्यक्रमात ते यशवंतनगर मधील गोळवलकर गुरुजी मैदान येथे बोलत होते.

Spread the love

हिंदू समाजापासून संघाचे अस्तित्व वेगळे नाही हे संघसंस्थापक यांनी दाखवले.अभिजीत शिंदे. The founder of the Sangh, Abhijit Shinde, showed that the existence of the Sangh was not separate from the Hindu society.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, प्रतिनीधी व. २२ मार्च.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव हेडगेवार यांचा विचार कृतीवर होता आणि त्यातून त्यांनी छोट्या गोष्टीतून सहकाऱ्यांवर संस्कार केले. संघाचा संप्रदाय त्यांनी कधी होऊ दिला नाही. हिंदू समाज पासून आपले अस्तित्व वेगळे आहे असे कधी संघाने दाखवून दिले नाही. वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कधी हेडगेवार यांनी केला नाही. समाजाचे संघटन असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रभक्ती निर्माण आणि संस्कारक्षम व्यक्ती निर्मिती याकामावरच त्यांनी आयुष्भर काम केले असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा तरुण व्यवसायी प्रमुख अभिजीत शिंदे यांनी व्यक्त केले.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तळेगाव दाभाडे आयोजित ‘ वर्षप्रतीपदा उत्सव ‘ कार्यक्रमात ते यशवंतनगर मधील गोळवलकर गुरुजी मैदान येथे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे सुनील जैन , पुणे जिल्हा कार्यवाह हेमंत दाभाडे, तळेगाव शहर कार्यवाह राहुल जांभूळकर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, हिंदू संस्कृती मध्ये गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. नवीन कालगणना युगब्ध सुरू झाली. ऐतिहासिक दाखले ही या उत्सवाला असून शालिवाहन यांनी शकांचा पराभव केला. संघाचे दृष्टीने संघ संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांचा जन्मदिवस आहे. संघटना मध्ये सामर्थ्य आहे,हे त्यांनी सांगितले त्याला नमन करण्याचा आजचा दिवस आहे.

डॉ. हेडगेवार यांनी विविध राजकीय, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. स्वाभिमानी राष्ट्राला गुलामगिरीत राहणे आवडत नाही, त्याकरिता देशातील नागरिकात राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. संघटन कौशल्याचा जोरावर त्यांनी संघाचा कामाचा विस्तार केला. संघटना, शिस्त आणि आज्ञाधारकपणाच्या जोरावर ब्रिटिशांनी आपल्या मोठ्या लोकसंख्येवर राज्य गाजवले हे त्यांनी ओळखले आणि त्यादृष्टीने कामास सुरवात केली.

 

विविध विचाराचे, स्वभावाचे लोक त्यांनी संघ कार्यात सामावून घेतले आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीत ते हळवे होते.माणसांची पारख असल्याने योग्य व्यक्तीला योग्य काम ते देत होते. संघात विकार मुक्त अर्थव्यवस्था असून स्वयोगदानामुळे काम करण्यात येते. संघ हा डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचे प्रकटरूप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सुनील जैन यांनी ही मनोगत व्यक्त केले.

हेडगेवार भवन येथे पूजन कार्यक्रम

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हेडगेवार भवन याठिकाणी दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या वतीने पूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र माने यांनी उपस्थिताना संबोधित केले. नगरपरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सरनाईक यांनी ही यावेळी हेडगेवार यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!