आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव” उत्सवातील छबीना पालखी सोहळा संपन्न.

Spread the love

 ग्रामदैवत. श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव” उत्सवातील छबीना पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणा करीत उत्साहात संपन्न.village god Celebration of Shri Dolasnath Maharaj” Chhabina Palkhi ceremony of the festival concluded with enthusiasm by going around the village.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ मार्च.

 

भोई समाजाचा मान असलेला छबीना पालखी, ग्राम प्रदक्षिणा करीत, बॅंडच्या तालावर, संबळच्या वाद्यांवर, उंट व घोड्यांच्या दिमाखात, उत्साहात संपन्न झाला.

 

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांचा उत्सव” उत्सवातील छबीना पालखी सोहळ्याची सुरुवात डोळसनाथ महाराजांच्या मंदिरातुन सायं. ६.३०. वा.‌ श्रीमंत सरदार सत्येंद्र राजे दाभाडे सरकार यांच्या हस्ते आरती करून, प्रस्थान झाले. तेथुन दाभाडे सरकारांच्या वाड्यावर, नाथांचे औक्षण करण्यात आले, पुन्हा छबीना डोळसनाथ मंदिर समोरुन भेगडे आळी मार्गे , गणपती चौक, भोई आळी, राजेंद्र चौक, मारुती मंदिर जिजामाता चौक, गणपती चौक ते पुन्हा मंदिरात रात्री ११ वा. पोहचली.

हजारो महिला भगिनींनी औक्शन करत नाथांचे दर्शन घेतले दर्शनासाठी हजारो भाविक भक्त जमा झाले होते. बँड पथकाच्या गजरात, गोंधळींच्या  संभळच्या तालावर, व भजनी मंडळा बरोबर, महाराजांच्या पाच आरत्या संपन्न झाल्या. नाथांचे पुजारी गुरव बंधूंनी छबिन्याची आकर्षक अशी फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती.

छबीना पालखी सोबत मा. राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे, राजेश सरोदे.‌मा शिक्षण मंडळ सभापती, तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी, गावकरी व भोई समाजाचे सर्व खांदेकरी  केशरी फेटे बांधून पालखीला खांदा देत नाथांचा गजर करीत होते. व ठरलेल्या जागी आरत्या संपन्न झाल्या.

नागरिक बंधू भगिनींनी पालखी मार्गावर रांगोळ्यांनी व फुलांनी सजावट करून औक्षण करून, दर्शनासाठी गर्दी केली होती. नाथांचा जयघोष करीत छबीना पालखी रात्री ११ वाजता मंदिरात सांगता झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!