आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

तळेगाव दाभाडे: मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा ५ वा वर्धापनदिन श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.

त्यानिमित्ताने वार्षिक सर्वसाधारण सभा, अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा ५ वा वर्धापनदिन श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.त्यानिमित्ताने वार्षिक सर्वसाधारण सभा, अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न झाला.Talegaon Dabhade: The 5th anniversary of Maval Taluka Warkari Sampradaya Mandal was concluded with great enthusiasm at Shree Saibaba Sevadham, Kanhe Phata. 

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, २४ मार्च.

 

मान्यवरांच्या हस्ते, मावळ रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ह.भ.प. सोपानराव म्हाळस्कर, ह.भ.प. शंकरराव शेलार, श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव उर्फ बाळासाहेब काशिद पाटील, ह.भ.प. पंकज महाराज गावडे,
भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे, माजी सरपंच सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुधीर पारिठे, भरत येवले, शिवाजीआण्णा पवार, कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नितीनदादा घोटकुले( संस्थापक अध्यक्ष गोधाम) हे होते.

दिपप्रज्वलन व श्री विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प. गणेश महाराज कारले यांची कीर्तनरूपी सेवा झाली. प्रास्ताविक सचिव रामदास पडवळ यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंकुमार भसे महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंडळाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अहवालाचे प्रकाशन झाले व मंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड.सागर एकनाथ शेटे यांनी अहवालाचे वाचन केले.

त्यानंतर मंडळाच्या वतीने आदर्श वारकरी म्हणून कल्हाट गावचे जेष्ठ वारकरी ह.भ.प. खंडुजी महाराज धंद्रे व घोणशेत गावचे ह.भ.प. माऊली महाराज कदम यांना आदर्श वारकरी म्हणून मावळ रत्न पुरस्काराने मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आदर्श किर्तनकार म्हणून ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कोंडे( डोणे), प्रवचनकार ह.भ.प. पांडुरंग महाराज गायकवाड( कांब्रे), मृदंगाचार्य ह.भ.प. भाऊसाहेब आगळमे( साते), गायनाचार्य ह.भ.प. अरूण महाराज येवले(पाचाणे) यांना मावळ रत्न पुरस्कार देवून गौरवण्यात आले. ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. मा. राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले व ह.भ.प. नितीनदादा घोटकुले यांचे भाषण झाले.

पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे, कोषाध्यक्ष बजरंग घारे, सहसचिव नितीन आडिवळे, विभागीय अध्यक्ष दीपक रावजी वारिंगे, शांताराम लोहर, शांताराम गायखे, बळवंत येवले, लक्ष्मण ठाकर, विभाग प्रमुख निलेश प्रकाश शेटे, सुखदेव गवारी, पंढरीनाथ वायकर, देवराम सातकर, संजय महाराज बांदल, बंडू कदम, सुभाष महाराज पडवळ, सुनिल महाराज वरघडे, विभाग प्रमुख गणपत पवार, बाळासाहेब राजिवडे, दत्तात्रय ठाकर, भगवान सावंत, राजाराम असवले, बाळासाहेब वारिंगे, भिवाजी गायखे, अभिमन्यू शिंदे, रोहिदास जगदाळे, सोमनाथ सावंत, सदाशिव पेठकरh, भाऊ हुलावळे, गोविंद सावले, सोमनाथ सातपुते, पत्रकार मच्छिंद्र मांडेकर, रवि ठाकर, रोहिदास खांडेभराड, राजाराम विकारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!