आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

चित्रकला स्पर्धेत अंकीत समंता, स्वाती केवट प्रथम.

Spread the love

चित्रकला स्पर्धेत अंकीत समंता,
स्वाती केवट प्रथम.Ankit Samantha in painting competition,Swati Kevat firstt

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ मार्च.

 

तळेगाव दाभाडे नगर परिषद व फ्रेंड्स ऑफ नेचर
यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक
चिमणी दिनाचे औचित्य साधून ‘पक्षी’या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत मोठ्या गटात अंकीत समंता, तर छोट्या गटात स्वाती केवट यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत ७९६ विद्यार्थी सहभागी झाले होते.यशवंतनगर बायोडायवसिटी पार्क येथील निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा घेण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते
विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक,फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन,अध्यक्ष निरज शाही,
प्रकल्प प्रमुख डाॅ. गणेश सोरटे ,
माजी नगरसेवक निखील भगत, निरंजन जहागीरदार,
संस्थेचे अजीव सदस्य सुधीर राऊत आदी उपस्थित होते.

 

महेश महाजन यांनी चिमणी या विषयावर प्रबोधनपर माहिती सांगितली.माजी नगरसेवक निखील भगत
यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

निरज शाही यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन सुधाकर मोरे, अमित पोतदार, निशिकांत पंचवाघ, विवेक रामायणे, पूजा डोळस, दीपक शिरसाट आदींनी केले.
स्पर्धेचा निकाल:
मोठा गट:
प्रथम – अंकीत समंता,
द्वितीय – आर्या रणकुंभ ,
तृतीय: तेजस्विनी भाकरे.
छोटा गट:
प्रथम – स्वाती केवट ,
द्वितीय – दिशा जगदाळे,
तृतीय – श्रावणी येवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!